जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रकरणे ऑनलाईन सादर करावे

चंद्रपूर दि.11 ऑगस्ट: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) चा नवीन उपक्रमाद्वारे ऑगस्ट 2020 पासून संपूर्ण महाराष्ट्रात जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रकरणे सादर करण्याकरिता ऑनलाईन प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जाती निहाय मानीव दिनांकापूर्वीचे रहिवासी असलेल्या मागासवर्गीय अर्जदारांनी बार्टीच्या www.bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून कागदपत्रासह आपले परिपूर्ण अर्ज भरावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती चंद्रपूरचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी केले आहे.

नवीन उपक्रमाद्वारे अर्जदारांना कार्यालयात वारंवार येण्याची आवश्यकता नाही. परंतु काही प्रकरणात गरज भासल्यास अर्जदाराला आपल्या सर्व मूळ कागदपत्रांसह समितीसमोर दिलेल्या तारखेस उपस्थित राहावे लागेल. तसेच सद्यस्थितीत ऑनलाईन शुल्क पोर्टलवर कार्यरत नसल्याने शुल्क व अर्जाची हार्ड कॉपी, इतर सर्व कागदपत्रे व साक्षांकित प्रती कार्यालयात जमा करावे. अशा सूचना देखील समितीमार्फत करण्यात आल्या आहेत.

Post a comment

0 Comments