Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या समस्यांचा लवकर तोडगा काढावा
ABVP चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

कोविड-१९ महामारीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे मोठे उद्योग, व्यवसाय जवळपास बंद असून त्यांचा जनसामान्यांसोबत शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातही खुप अडचणी निर्माण झाल्या आहे.याबाबत अभाविप चंद्रपूर ने जिल्हाधिकारी यांना मागण्या व सूचना केल्या आहे.याबाबत लवकर तोडगा काढावा अशी मागणी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना अभाविपने केली आहे
यामध्ये प्रामुख्याने आर्थिक संकटामुळे सर्व अनुदानित, विना अनुदानित, कायम विनानुदानित शाळांनी शैक्षणिक शुल्कासाठी (फी) पालकांकडे आग्रह न करण्याचा सरकारच्या निर्देशाची तात्काळ कठोर अंमलबजावणी व्हावी. तसेच हे शुल्क टप्यात भरण्याची मुभा असावी.आर्थिक स्थिती बघता २०-३० टक्के पर्यंत शैक्षणिक शुल्क माफ़ करावी आणि हेच धोरण ११ प्रवेशासाठी सुद्धा राबवावे, ऑनलाईन-ऑफलाईन प्रवेश प्रक्रियेत कोणीही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी,विद्यार्थ्यांचे आरोग्यहित लक्षात घेता, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिये प्रमाणेच ग्रामीण भागासाठी तत्सम ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज त्यांच्या गावातील शाळेत भरून घेण्याची योजना करावी,ऑनलाईन प्रक्रियेसाठी यंदा PDF स्वरुपातच सूचनां व मार्गदर्शक तत्वे उपलब्ध होत असताना, ऑनलाईन प्रक्रियेचे शुल्क यावेळेस घेवू नये. अथवा ती प्रक्रिया संपूर्णपणे मोफत असावी,दरवर्षी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत येणारा घोळ व त्यामुळे विद्यार्थी व पालकांची होणारी धावपळ थांबविण्यासाठी बोर्ड उपलब्ध करून देणारे Guidance Center व सध्याची कोरोनाच्या प्राश्वभूमीवर या सेंटरवरच प्रश्नचिन्ह आहे, त्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या समस्या सोडविण्यासाठी तज्ञांची '24×7 हेल्प लाईन' सुरु करावी,कोरोनामुळे उशिरा सुरु होणारी शाळा, महाविद्यालय व त्यातील शिकवण्या, ऑनलाईन मार्गाने बोर्ड व विद्यापीठ परिक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण होण्याची साशंकता यामुळे CBSE च्या धर्तीवर महाराष्ट्राच्या पहिली ते बारावीचे अभ्यासक्रम २५-३०% कमी करावा.तसेच महाविद्यालयीन अभ्यासक्रम ही कमी करण्याचे नियोजन करावे, अनुदानित, विन पालकांकडे आग्रह न करण्याचा सरकारच्या निर्द तसेच ह माफ़ दिलेल्या सूचनांनुसार केजी टू बारावी ऑनलाईन शाळां सुरु होतील परंतु, फी न भरल्यामुळे कुठलाही विद्यार्थी ऑनलाईन वर्गातून वंचित ठेवला जावू नये याचे स्पष्ट निर्देश सर्वच शाळांना द्यावेत,अशा या आर्थिक संकटाच्या समयी अनुदानित व कायम- विनानुदानित शाळांनी त्यांच्या शिक्षकांचे व कर्मचारी वर्गाचे वेतन थकवू नये व या करीता आपन तसे निर्देश द्यावेत,कोणत्याही विद्यापीठ व महाविद्यालयाने कोणत्याही अभ्यासक्रमाचे वार्षिक प्रवेश फी व परीक्षा फी यामधे वाढ करु नये असे धोरण राबवावे,ग्रामीण व बाहेरील भागातील विद्यार्थी जे स्थानिक वसतिगृह मध्ये राहतात अश्या विद्यार्थ्यांना त्यांची आर्थिक स्थिती बघता वार्षिक फी अथवा इतर फी या करिता कोणत्याही वसतिगृह कडून फी वसुली साठी तगादा विद्यार्थ्यांना लावु नये असा आदेश काढावा,आर्थिक दृष्टीने बघता,विद्यार्थ्यांना शैक्षणिक भत्ता-शिष्यवृत्ती व विदयावेतन त्वरीत मंजुर करण्यात यावे.प्रकारचे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंद्रपूर च्या वतीने मा.जिल्हाधिकारी,चंद्रपूर यांना देण्यात आले यावेळी चंद्रपूर जिल्हा संयोजक प्रविण गिलबिले,चंद्रपूर महानगरमंत्री शुभम निंबाळकर, नगर महाविद्यालय प्रमुख शैलेश दिंडेवार,दामोदर द्विवेदी,पराग दिंडेवार,दीपक गोरे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies