चंद्रपूर जिल्हा आज 203 पॉझिटिव्ह राजकारणी,अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते पॉझिटिव्ह




चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 2547

24 तासात आणखी 203 कोरोना बाधितांची नोंद

उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 1269

1249 बाधित कोरोनातून बरे


चंद्रपूर्: जिल्ह्यामध्ये 24 तासात आणखी 203 कोरोना बाधितांची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 2 हजार 547 वर पोहोचली आहे. सध्या उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 1 हजार 269 असून आतापर्यंत 1 हजार 249 बाधित कोरोनातून बरे झाले आहेत.
जिल्ह्यात 24 तासात तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, बाबुपेठ चंद्रपूर येथील 55 वर्षीय पुरूष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 22 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 30 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे45 वर्षीय ऊर्जानगर चंद्रपूर येथील पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. 30 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती करण्यात आले होते. बाधिताला कोरोना व्यतिरिक्त श्वसनाचा आजार होता. 30 ऑगस्टलाच सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे.

तर तिसरा मृत्यु हा 65 वर्षीय गांधी वार्ड बल्लारपूर येथील पुरुष बाधिताचा झाला आहे. 29 ऑगस्टला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 30 ऑगस्टला बाधिताचा अहवाल पॉझिटीव्ह आला उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 29 बाधितांचा मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 26, तेलंगाणा, बुलडाणा व गडचिरोली येथील प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे.आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 122, राजुरा तालुक्यातील 13 , वरोरा तालुक्यातील 9, बल्लारपूर तालुक्यातील 9 , भद्रावती तालुक्यातील 3 , गोंडपिपरी तालुक्यातील 23, पोंभूर्णा तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील 5, सावली तालुक्यातील 2, मूल तालुक्यातील 12, नागभीड तालुक्यातील 4 बाधित असे एकूण 203 बाधित पुढे आले आहे.चंद्रपूर शहरातील रेस्ट हाऊस परिसर, पटवारी भवन वार्ड नं. 5, बिनबा वार्ड, ऊर्जानगर, रामनगर कॉलनी परीसर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर, पठाणपुरा वार्ड, जिल्हा कारागृह, दुर्गापुर सिद्धार्थ नगर वार्ड नं. 4, किरमे प्लॉट बाबुपेठ, चेतन गॅस एजन्सी जवळ रामनगर, आकाशवाणी रोड परिसर, साईबाबा वार्ड सिव्हिल लाईन, दुर्गापुर वार्ड नं.1, देना बँक परिसर बाजार वार्ड, बालाजी वार्ड गोपालपुरी, महाराष्ट्र बँक परिसर तुकूम, हनुमान मंदिर परिसर दादमहल वार्ड, भानापेठ वार्ड विजय टॉकीज परिसर, दिनकर नगर लालगुडा, कन्नमवार वार्ड अंचलेश्वर गेट परिसर, विठ्ठल मंदिर वार्ड, बाजार वार्ड चौधरी पॅलेस परिसर, भिवापूर वार्ड ओम नगर, प्लॉट नं.1 सोईतकर हाऊस परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, खत्री कॉलेज परिसर, जीवन साफल्य कॉलनी भागातून बाधित पुढे आले आहे.

Post a comment

0 Comments