जिल्हाधिकारी कार्यालय निर्जंतुकीकरण आणि स्वच्छतेसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सुरक्षारक्षक कोरोनाग्रस्त झाल्याने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचाही स्वॅब घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुरक्षा रक्षकाच्या संपर्कात आलेल्या सगळ्य़ांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.
सोमवारी म्हणजेच 10 ऑगस्ट रोजी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांच्या जागी गुल्हाने यांची नियुक्ती करण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. मंगळवारी म्हणजेच 11 ऑगस्टला गुल्हाने यांनी पदभार स्वीकारला होता. पदभार स्वीकारताच त्यांनी ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट या त्रिसूत्रीवर काम करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.