नदीपात्रातून नावेने (डोंगा) दारू तस्करी
धाबा परिसरात दारूविक्री फोपावली
गोंडपिपरी : महाराष्ट्र-तेलंगाना सिमेवरील धाबा परिसरात अवैध दारूविक्री सद्या चांगलीच चर्चेत आली आहे.अश्यातच काल सोमवारी परप्रांतातून दारूचा पुरवठा होणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.त्यामुळे आज धाबा पोलिसांनी नदीकाठावर धाड टाकून डोंग्यासह दारू,मोटारसायकलिसह विक्रेत्यांना ताब्यात घेतले आहे.
धाबा पोलीस स्टेशन अंतर्गत गावात परप्रांतातून दारूचा पुरवठा होत असल्याचा प्रकार काही दिवसांपासून चर्चेत होता.अश्यातच काल सोमवारी सिमेवरील डोंगरगावच्या हद्दीतून डोंग्याद्वारे दारूचा पुरवठा होत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर वायरल झाला.यापूर्वी सुद्धा परिसरात अवैध दारू विक्रीसंदर्भात चांगलीच चर्चा रंगली.
अश्यातच काल वर्धा नदीतून दारूपुरवठा होत असल्याचा व्हिडिओ सर्वांनी बघितला.यामुळे पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली.याच दरम्यान गोजोली येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने नदीकाठावर भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.त्यावेळी दारूपुरवठा होत असल्याचे चित्र दिसून आले.यावेळी उपस्थित दारू पुरवठादारांकडून दादागिरीची भाषा वापरण्यात आली.त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी याची माहिती धाबा पोलिसांना दिली.लागलीच ठाणेदारांनी घटनास्थळावर पोलिस पथक पाठविले.घटनास्थळी पोलीस दाखल होतात त्यांनी दारूची वाहतूक करणाऱ्या डोग्यासह मोटारसायकल व संशयित आरोपींना देखील ताब्यात घेतले आहे.यात किरमिरी येथील कुख्यात दारूविक्रेत्यासह तिघांचा समावेश आहे.दारूसह,डोंगा आणि मोटारसायकल पोलिसांनी जप्त केले असून या घटनेसंदर्भात अधिक तपास धाबा पोलिसांकडून सुरू आहे.यात ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बाळू ताजणे, प्रदीप उयके, सुनील उयके, नागेश ठाकूर, बंडू पाल या आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनात सुशील धोकटे यांनी केली आहे.
0 Comments