Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

निराधारांना आधार देण्यास युवक पुढे सरसावलेआगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा होतोय, आ.मुनगंटीवार यांचा वाढदिवस

चंद्रपूर :- भारतीय जनता पार्टी तर्फे संपूर्ण जिल्ह्यात लोकनेते आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस (३० जुलै) सर्वत्र साजरा होत असताना माता महाकाली प्रभाग क्र १२ च्या युवावर्गाने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने युवानेते प्रज्वलंत कडू यांचे नेतृत्वात आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस साजरा केला.युवकांनी आज गुरुवार (३०जुलै)ला तब्बल ८९ निराधारांना,निराधार योजनेचा,तर १७६ लोकांना जनधन योजनेचा लाभ मिळावा खाते उघडून दिल्याने याची चर्चा आता महानगरात सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी सरकारने गरिबांसाठी अनेक योजना केल्या आहेत, पण त्याची माहिती या लोकांना नाही व त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. जनतेला याचा लाभ मिळावा म्हणून,आज महाकाली प्रभागातील युवकांनी तिरुमला भवनात एका जनसेवा कार्यक्रमाचे आयोजन ३० जुलै ते १ ऑगस्ट पर्यंत केले आहे.महानगर भाजपा च्या वतीने नियोजित या उपक्रमात युवकांनी बाजी मारली.आणि आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली.जनसेवा कार्यक्रम असे या उपक्रमाचे नामकरण नगरसेवक सुभाष कासंगोट्टूवार,प्रज्लंत कडू,अमीन शेख ,रामकुमार आकापेलिवार यांनी केले.संजय गांधी निराधार योजना,राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना,श्रावण बाळ योजना,प्रधानमंत्री जनधन खाते,क्षिधापत्रिका पत्रिका असे अनेक अडचणीच्या वाटणाऱ्या विषयाला सोपे करून शासकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले.आणि गरजूंनी तिरुमला भावनाकडे धाव घेतली.बघता बघता दिवसभरात २६५ गरजूंना आज दिलासा व. येथील नगरसेवक अनुराधा हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रज्वलंत कडू व सूरज पेदूलवार यांनी हे आयोजन केले.मयूर चहारे, पंकज निमजे,राहुल शेंडे, श्रीकांत येलफूलवार, विवेक शेंडे, वैभव बल्लेवार, रिंकेश ठाकरे, आशीष खाडिलकर, राकेश फलके, आकाश घोटेकर, नीतेश वाढई, सचिन यामावार, पवन वाढई, आकाश निकोडे, कुणाल निकोडे, अनिकेत चौधरी, आदर्श चौधरी, सुमित मोहुर्ले, सौरभ बंडेवार, सुमित पटेल, नरेंद्र पराते, राहुल मांढरे,राहुल खेवले या युवकांनी मोलाचे सहकार्य केले.

या युवकांचे कौतुक करण्यास भारतीय जनता पार्टी महानगरचे जिल्हा अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे,जेष्ठ नेते प्रमोद भाऊ कडु, महापौर राखीताई कंचर्लावार , प्रकाश धारणे, दत्त प्रसन्न महादानी, प्रशांत विन्घ्नेश्वर, यश बांगड़े, आशीष नुग्गुरवार यांनी उपस्थिती दर्शविली.

Post a comment

0 Comments