उपसरपंचांचे डोके ठिकाणावर आहे का..?
धामणगाव येथील शुद्ध व थंड पाण्याचे ए.टी.एम. ने वातावरण तापले


राजुरा/प्रतिनिध

बिबी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या धामणगाव येथे स्मार्ट ग्राम निधीतून शुध्द व थंड पाण्याचे ए.टी.एम. मंजूर करण्यात आले. या पाण्याच्या ए.टी.एम चे उद्घाटन ०२-०२-२०२० रोजी करण्यात आले. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून सदर कामासाठीचा आवश्यक संपूर्ण निधी खर्च झाला. परंतु, भूमिपूजन करून मोठा गाजावाजा करण्यात आलेल्या पाण्याचे ए.टी.एम. अजून सुरू झाले नाही. प्रत्यक्ष जागेवर भूमिपूजन बोर्ड सोडून काहीही नाही.

पावसाळ्यात गावात पिण्यासाठी शुद्ध पाण्याची आवश्यकता असल्याने तातडीने धामणगाव येथील शुध्द व थंड पाण्याचे ए.टी.एम. सुरू करावे. केवळ भूमिपूजन बोर्ड पाच महिन्यांपासून असून प्रत्यक्षात अजूनही लाभ मिळाला नाही. याबाबत तातडीने पाऊले उचलणे गरजेचे असल्याचे म्हणत धामणगाव वासियांनी आज बिबी येथील ग्रामंचायत कार्यालयात सरपंच मंगलदास गेडाम यांना निवेदन दिले.
या लोकहिताच्या रास्त समस्येवर पाऊले उचलणेएेवजी उपसरपंच आशिष देरकर धामणगाव वासियांवर चांगलेच चिडले. उपसरपंच देरकर म्हणाले की,
धामणगाव येथील काही लोकांच्या डोक्यात फरक पडल्यासारखे वाटत आहे. हे लोक गरीब आदिवासी लोकांना लुटून खाऊन सुद्धा उजागिरीने वागत आहे. गरिबांना लुटून 10 वर्षांपासून भ्रष्टाचार करून पोट भरत होते. उत्पन्नाचा स्रोत गेल्यामुळे कावरल्यासारखे करून काहीतरी खोटा उपद्व्याप करीत आहे. पुढे ते म्हणाले की, "कोरोनामुळे कामाला विलंब होत असून लवकरचं काम पूर्ण करण्यात येईल."

विशेष म्हणजे प्रत्यक्ष जागेची पाहणी केली असता धामणगाव वासियांची मागणी रास्त वाटली. तिथे केवळ भूमिपूजन झाल्याचा बोर्ड पाच महिन्यांपासून इतर काहीही दिसत नाही. दरम्यान, विकासकामांची सार्वजनिक मागणी करणाऱ्या नागरिकांवर वैयक्तिक वार करणे, खोटे आरोप करून दबाव तयार करण्याचा प्रयत्न करणे आणि मूळ मागणीला बगल देत राजकरण करणे हे उपसरपंच आशिष देरकर यांनी थांबविले पाहिजे. आम्ही कोणावरही वैयक्तिक टिप्पणी केली नव्हती आणि जनतेची मागणी घेऊन लोकप्रतिनिधीकडे गेल्यावर जी अरेरावीची विकृतीदर्शक भाषा वापरली ती अत्यंत निंदनीय असल्याचे मत धामणगाव येथील रहिवासी कमलाकर उरकुडे, सुनील मडावी यांनी मांडले. तर, सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे पाठपुरावा करून जनतेच्या हक्काचे पाण्याचे ए.टी एम. सुरू करू असा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला. तर धामणगाव वासियांचा लोकप्रतिनिधेने अपमान केला असून सत्तेचा अहंकार आलेल्या लोकांना जनता योग्य तो धडा शिकवेल असे मत धामणगाव येथील वरिष्ठ नागरिक रामचंद्र पाटील इंगोले यांनी मांडले. आता, उपसरपंचाचे डोके ठिकाणावर आहे का..? अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.

Post a comment

0 Comments