Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत; तर बारावीचा निकाल १५ ते २० जुलैदरम्यान




मुंबई :- कोरोनाचं संकट आणि त्यामुळे करावा लागलेला लॉकडाऊन यामुळे दहावी आणि बारावीचे निकाल खोळंबले आहेत. हे निकाल लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. दहावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत; तर बारावीचा निकाल १५ ते २० जुलैदरम्यान लागणार असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. हिंगोली दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना निकालाबद्दलची माहिती दिली.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका शैक्षणिक क्षेत्रालादेखील बसला आहे. दहावी, बारावीचे विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत. निकालाला विलंब झाल्यानं आता पुढील प्रवेशालादेखील उशीर होणार आहे.

राज्यातील नऊ विभागीय मंडळाचा निकाल एकत्रित जाहीर केला जातो. यापैकी मुंबई, ठाणे, पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे पेपर तपासणीच्या कामाला उशीर झाला आहे.

कोरोनाचा फैलाव सुरू झाला तेव्हा बारावीची परीक्षा पूर्ण झाली होती. दहावीचा भूगोलाचा पेपर कोरोनामुळे रद्द झाला. या पेपरचे गुण सरासरी पद्धतीनं दिले जाणार आहेत. शासनानं शाळा महाविद्यालयानं अद्याप परवानगी दिलेली नाही. बारावीचे निकाल ऑनलाईन जाहीर झाल्यानंतर आठ दिवसांनी गुणपत्रिका दिल्या जातात. त्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात यावं लागतं. मात्र सध्याच्या परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबद्दल शासन काय निर्णय घेतं, हे पाहणं महत्त्वाचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies