Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कार्यवाही देशी विदेशी कट्टा व जिवंत काडतुससह ५ लक्ष ४५ हजाराचा मुदद्माल जप्त


चंद्रपूर : काडतुससह ५ लक्ष ४५ हजाराचा मुदद्माल जप्त दिनांक 20/07/2020 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन माजरी अप.क्र.154/20 कलम 353 भा.दं.वि. सहकलम 4,25 भा.ह.का चे गुन्ह्यातील फरार आरोपी नामे शाहरुख अस्लम शेख, वय 22 वर्षे, रा. बांदा दफाईल नं. 2 माजरी हा त्याचा साथीदार राकीब सगीर अहमद सिद्दीकी वय 20 वर्षे रा. शिवाजीनगर माजरी याचे व हत्यारासह त्यांचे पांढर्या रंगाची चारचाकी Hyundai GETZ गाडी क्र. MH34K8030 ने मौजे खुटाळा, पो.स्टे. पडोली हद्दीमध्ये फिरत आहे.

यावरून स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचुन दिनांक 20/07/2020 रोजी रात्री आरोपी नामे शाहरुख अस्लम शेख, वय 22 वर्ष, रा. बांदा दफाईल नं. 2 माजरी हा त्याचा साथीदार राकीब सगीर अहमद सिद्दीकी, वय 20 वर्षे रा. माजरी हे दोघे मौजा खुटाळा येथे मिळालेल्या माहितीप्रमाणे वरील कमांकाच्या चारचाकी वाहनासह मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी विरोध करून सरकारी कामात अडथळा आणला. परंतु पोलीस पथकाने शिताफीने त्यांना पकडुन त्यांची झडती घेतली असता, त्यांचे ताब्यात एक विदेशी बनावटीचा कटटा(माउझर) चार जिवंत काडतुससह व एक देशी बनावटीचा कटटा तसेच तलवार चाकु असा माल आरोपीतांकडुन जप्त करून त्याबाबत पोस्टे पडोली येथे अप.क्र.139/20 कलम 35330734 आला,भा.दं.वि. सहकलम 3, 4, 25 भा.ह.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात.

आज रोजी तपासादरम्यान आरोपीतांना विचारपुस केली असता, आरोपींनी एकता नगर तेलवासा येथे केलेली घरफोडी तसेच पोस्टे घुग्घुस हदीतील मंदीरातील चोरी व माजरी येथील चोरी केल्याचे कबुल करून आरोपी राहत असलेल्या मौजा खुटाळा येथील त्यांचे घर झडतीत पुढिल पैकी, 1) 24 ग्रॅम वजनाची सोन्याची चपलाकंठी, किं.अं. 67,200/- रुपये 2) 12 ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोप किं.अं. 33,600/- रुपये. 3) 9 ग्रॅम वजनाचे दोन टॉप्सवेल टॉप्स सहित किं अं. 9000/- रुपये. 4) प्रत्येकी 3 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या किं.अ. 16,800/- रुपये. 5) 4 ग्रॅम वजनाचे दोन मणी असलेलेल डोरले किं. अं. 11,200/- रुपये. 6) दीड ग्रॅम वजनाची D ची प्रिंट असलेली अंगठी कि.अं.,5000/-रु.7) 1 ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट किं.अं. 2000/- रु. 8) 100 ग्रॅम वजनाच्या दोन चांदीच्या पायपटट्या किं.अं. 6000/- रुपये. 9) 20 ग्रॅम वजनाचा चांदीचा WCL चा शिक्का कि.अं. 1000/-रुपये. 10) नगदी 25,000/- रुपये. तसेच 1) एक Indane कंपनीचा घरगुती गॅस सिलेंडर, किं.अं. 1500/- रुपये.,2) एक कुलरचा टब किं.अं. 300/- रुपये. 3) एक SANSUI कंपनीचा एल.सी.डी. टी. व्ही. किं.अं.

2000/- रुपये. 4) होम थिएटर साऊंड्स, किं.अं. 500/- रुपये. 5) 3 सिन्थॉल, 3 फाँग कंपनीचे बॉडी स्प्रे किं.अं. 500/- रुपये. 6) एक रुपयांचे 150 नाणी, 2 रुपयांचे 135 नाणी, 5 रुपयांचे 19 नाणी. 10 रुपयांचे 10 नाणी, असे एकुण 615/- रुपये तसेच इतर रोख रक्कम असे एकुण 4300/- रुपये. 7) एक लोखंडी एक लोखंडी आरी किं अं. 50/- रु. त्याचप्रमाणे आरोपीतांकडुन दोन टामी किं.अं. 100/- रु. 8) दुचाकी Bajaj Pulsar मो.सा. किं. 50,000/-रू, 1) Honda CBR मो.सा. क्र. MH27AY5957 किं.अं. 50,000/- रु. 2 ) विना क्रमांकाची सदर कार्यवाही मध्ये सोने चांदीचे दागीने, नगदी रोख, एक चारचाकी वाहन, दोन दुचाकी वाहन, देशी विदेशी कटटा व चार जिवंत काडतुससह एकुण 5,43,350/ रू.चा मुददेमाल आरोपीकडुन जप्त केला आहे.

वरील आरोपींकडुन पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन भद्रावती येथे अप.क्र. 344/20 कलम 454457380 भा.दं.वि., 374/20 कलम 454, 457, 380 भा.दं.वि., पोलीस स्टेशन माजरी येथे अप.क्र. 124/20 कलम 461,380 भा.दं.वि., पोलीस स्टेशन घुग्घुस येथे अप.क्र. 26/20 कलम 457, 380 भांदवि असे गुन्हे उघडकीस आले आहे.

आरोपी पोलीस कोठडी रिमांड मध्ये असुन आरोपीतांकडुन आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पुढिल तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे. सदरची कार्यवाही डॉ.श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक चंद्रपुर व अपर पोलीस अधीक्षक चंद्रपुर श्री. प्रशांत खैरे यांचे मार्गदर्शनात पोनि. स्थागुशा श्यामप्रकाश कोकाटे, यांचे नेतृत्वात जितेंद्र बोबडे, विकास मुंढे,सचिन गदादे, हवा. केमेकर, संजय आतकुलवार, धनराज करकाडे, अमोल धंदरे, गोपाल आकुलवार, प्रशांत नागोसे, रवी पंधरे, जावेद सिददीकी, प्रफुल मेश्राम व दिनेश, सर्व चंद्रपुर यांनी पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies