Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

माजी शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश भिवगडेची दादागिरी
दांडीया मंडप डेकोरेशन ची दोन वर्षापुर्वी ची शिल्लक रक्कम मागीतल्यावरून केली शिवीगाळ !

काही झाल्यास भिवगडे यांना दोषी धरण्यात यावे-डेकोरेशन मालक नितीन अलोणे यांची पत्रकार परिषदेत केली मागणी!
चंद्रपूर : एखाद्या राजकीय पक्षांचे पद घेऊन त्याचा फायदा आपल्या चुकीच्या व्यवसायासाठी करण्याचा, आपल्या काळ्या व्यवसायावर पडदा टाकण्याचे कार्य करण्याची आज जणु स्पर्धाचं लागली आहे, असाचं एक प्रकार आज पत्रकार परिषदेतून मंडप डेकोरेशन मालक नितीन अलोणे यांनी उघडकीस आणला.

सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की, सन 2018 मध्ये शहरातील सिंधी पंचायत मैदानावर शिवसेना दांडिया उत्सवाचे आयोजन शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सतीश भिवगडे यांनी केले होते, या कार्यक्रमाचे मंडप डेकोरेशन व साउंड सर्व्हिसेस चे काम नितीन अलोणे या मंडप डेकोरेशन चे देण्यात आले, त्या कामाची उर्वरित लाखो रूपयांची रक्कम मागण्यासाठी गेलेल्या डेकोरेशन मालकाला शिवीगाळ केल्याची पोलीस तक्रार दिली असल्याची माहिती नितीन अलोने यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

सदर मंडप डेकोरेशन च्या कामाचे एकूण बिल 2 लाख 10 हजार रुपये झाले होते, भिवगडे यांनी अलोने याला 70 हजार आधीच एडवांस स्वरूपात दिले व पुढचे पैसे 10 दिवस त्या उत्सवात आपली सेवा पुरविली. जवळपास त्या कार्यक्रमाला दीड वर्षे लोटले असताना अजूनही अलोने यांना उर्वरित रक्कम तब्बल 1 लाख 40 हजार मिळाले नाही, उर्वरित रक्कम देण्यास भिवगडे टाळाटाळ करीत होते.
यावर्षी जगात व देशात कोरोना विषाणूने हाहाकार माजविल्याने सर्व क्षेत्रातील कामे ठप्प पडली आहे. यामुळे अलोने हे सतीश भिवगडे यांना 11 जुलैला भेटून घरची परिस्थिती काय त्याबद्दल कल्पना देत पैसे देण्याची मागणी केली असता नितीनला अश्लील शब्दात शिवीगाळ करून धक्कामुक्की करण्याचा प्रकार केला असा आरोप अलोने यांनी भिवगडे यांचेवर केला आहे.

घडलेल्या प्रकारची अलोणे यांनी रामनगर पो. स्टे. ला तक्रार केली असून आपल्या मेहनतीचे पैसे देण्यात यावे तसेच आपल्याला काही कमी जास्त झाल्यास भिवगडे यांना याबाबतीत दोषी धरण्यात यावे, अशी मागणी पत्रकार परिषदेत नितीन अलोने यांनी केली.

मोठ्या राजकीय पक्षांच्या नावावर घेण्यात आलेल्या या कार्यक्रमामधील परिश्रमाचा पैसा पदावरील तत्कालिन पदाधिकारी देण्यास टाळाटाळ करतो व पैशाची मागणी केली म्हणून पदाच्या नावाचा गैरवापर करून शिवीगाळ करतो, ही गंभीर बाब असून पक्षश्रेष्ठी यावर काय पाऊल उचलते व पोलिस या प्रकारावर काय करेल, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. आज कोरोनासारख्या भयावह स्थितीशी सारेच व्यवसायी सामना करित आहे. प्रत्येकांचे व्यवसाय हे डबघाईस आले आहेत, अशावेळी हे प्रकरण घडले असून डेकोरेशन व्यावसायिकाला त्याचे उर्वरित रक्कम प्राप्त करून देण्यास कोणी पुढे येईल काय? हे येणारी वेळ सांगेल.

Post a comment

0 Comments