(चंद्रपूर/प्रतिनिध)
राज्यस्तरीय राजश्री शाहू महाराज विचार मंचा तर्फे समाज भूषण पुरस्कारा अवार्ड 2020 या पुरस्काराचे मानकरी श्री.राजेश बसवेश्वर हजारे यांची निवड करण्यात आली.
राजेश हजारे याने क्रीडा,सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत असल्याने त्याला आत्ताच महाराष्ट्र युथ आयडल पुरस्कार देण्यात येत आहे. हा पुरस्कार त्याला 3 सप्टेम्बर 2020 रोजी मुंबई येथे देण्यात येणार आहे.
राजेश हजारे हा गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली शहरात वास्तव्याने राहतो.
एका ग्रामीण भागात जाऊन त्याने इतकी प्रगती करणे म्हणजे खूप कौतुकास्पद बाब आहे. आणि तो नेहमी सामाजिक क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असतो.सद्या तो सरदार पटेल महाविद्यालयात चंद्रपुर येथे बी.ए अंतिम वर्षात शिकत आहे. या पुरस्काराचे श्रेय वडील बसवेश्वर हजारे आणि आई सत्यमा हजारे तसेच सरदार पटेल महाविद्यालयाचा प्राचार्य डॉ.राजेश पी इंगोले,उपप्राचार्य डॉ स्वप्नील माधमशेट्टीवार,डॉ.प्रकाश शेंडे, विभागीय समन्वयक प्रा.कुलदीप गोंड, क्रीडा विभाग प्रमुख डॉ.विजय सोमकुवर,डॉ.उषा खंडाळे,प्रा. बिरादार,डॉ.निखिल देशमुख इत्यादीना दिले आहे.