सोमवारी शेतकऱ्यांनी माणिकगड सिमेंट प्रकल्पातील खाण क्षेत्रातल्या टॉवरचा ताबा घेतला.
गेली अनेक वर्षे शेतीवर कब्जा आणि वहिवाटीसाठी रस्त्याचे प्रकरण प्रलंबित आहे. वारंवार अर्ज, विनंत्या, पाठपुरावा करूनही सिमेंट कंपनीने ग्रामस्थांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली आहे. प्रकल्पग्रस्त कुसुंबी गावातील पाच प्रकल्पग्रस्तांनी टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. घटनास्थळी पोलिस आणि महसुली अधिकारी दाखल झाले आहेत. आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत टॉवरवरून खाली न उतरण्याचा आंदोलकांचा निर्धार आहे.