पोलिसांसोबत पोलीस योद्धा म्हणून सहकार्य करण्याचे चंद्रपूर पोलीस दलातर्फे आव्हान
चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्यअंतर्गत तसेच चंद्रपुर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा (कोविड 19) प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी हे आपले कर्तव्य बजावित असताना त्यांचेवर गुन्ह्यांचा तपास, बंदोबस्त, नाकाबंदी, बाहेर राज्यातुन व जिल्ह्यातून आलेले प्रवासी यांची तपासणी सेंटर येथील बंदोबस्त व पोलीस ड्युटीचा ताण आधीच असताना जिल्ह्यातील कोरोना बाधित व त्याचा संपर्कात आलेल्या व्यक्तिंवर विशेष लक्ष द्यावे लागत आहे. तसेच स्वतःच्या कुटूंबाची सुद्धा जबाबदारी पार पाडत आहे. या सर्व बाबींचा विचार करता पोलिसांना सर्वसामान्य जनतेकडून विशेषतः युवकांकडून सहकार्य करण्याची गरज आहे.

याच बाबीचा अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्या पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील युवा पिढीला पोलिसांसोबत काम करून त्यांच्या सारखे जीवनात कायदा व नियमाचे पालन करून जीवन जगावे यासाठी "पोलीस सुद्धा" हा एक अभिनव उपक्रम राबविण्याची योजना आहे सदर योजनेचे अंतर्गत समाजातील युवकांना पोलिसांबरोबर निस्वार्थपणे 15 दिवसांत करिता "पोलीस योद्धा" म्हणून सेवा बजावून पोलीस दलास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे सदर "पोलीस योद्धा" तरुणांना चंद्रपूर जिल्हा पोलिसांकडून त्यांनी बजावलेल्या अमूल्य योगदानाबद्दल सन्मान प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.

आवाहन: सामाजिक कार्यात रुची असणाऱ्या व पोलिसांच्या कार्यात मदत करू इच्छिणाऱ्या युवकांना चंद्रपुर पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की, कोरोनासारख्या गंभीर आपत्तीत पुढे येऊन पोलीस दलाच्या खांद्याशी खांदा लावून पोलिसांसोबत कर्तव्य बजावून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावावी.
पोलीस व जनता हे एकत्र येऊन काम केल्यास निश्चित सर्वत्र झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास यश मिळेल.
खालील लिंक वर आवश्यक माहीती भरून जास्तीत जास्त संख्येनी ''पोलीस योद्धा'' उपक्रमात सहभागी व्हा.

Post a comment

0 Comments