दुर्गापूर – प्रेयसीची छेड काढल्याने मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
13 जुलै ला रामटेके यांच्या घरामागील सांदवाडी परिसरात कवेलूच्या खाली माणसाच्या हातासारखे हाड बाहेर आले आहे अशी माहिती देवानंद थोरात यांनी पोलीस स्टेशन दुर्गापूर येथे माहिती दिली.
माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक खोब्रागडे यांनी चौकशी केली असता त्या कवेलू खाली मानवी अवशेष असल्याचे आढळले, रात्र झाली असल्याने तपासात अडथळे येत असल्याने दुसऱ्या दिवशी तपासाला गती देत चौकशी केली असता दुर्गापूर वॉर्ड क्रमांक 1 मधील 17 वर्षीय अनिकेत रामटेके हा 10 ते 12 दिवसापासून बेपत्ता आहे.
सोबत त्याचा मोठा भाऊ अंकित रामटेके हा सुद्धा बेपत्ता होता.
पोलिसांनी दोन्ही भावांबद्दल त्यांच्या आईकडून माहिती घेतली असता लहान मुलगा बाहेर गावी काम करायला गेला व मोठा मुलगा सुद्धा कामानिमित्त बाहेर आहे.
घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता मोठा भाऊ अंकित यांचेवर संशय येऊन त्याची शोधमोहीम सुरू केली, मोबाईल लोकेशन घेतले असता त्याचा मोबाईल स्विच ऑफ असल्याने त्याची लोकेशन सुद्धा पोलिसांना मिळत नव्हती.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांना अंकित हा इराई नदीजवळील गुरांच्या गोठ्यात लपून असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता अंकितला ताब्यात घेतले.
अंकीतची कसून चौकशी केली असता त्याने लहान भाऊ अनिकेत ला मारल्याचे कबूल केले तो मृतदेह अनिकेत चा असल्याची कबुली सुद्धा अंकितने दिली.
आरोपी अंकित ने गुन्ह्याचे कारण सांगितले असता अनिकेत ने अंकितच्या प्रेयसीची छेड काढली म्हणून मी त्याला ठार केले, मी माझ्या प्रेयसी सोबत लग्न सुद्धा करणार होतो.
उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांनी माहिती दिली की आरोपी अंकित हा क्राईम पेट्रोल, सीआयडी सारखे सिरीयल मधून हा प्रकार केला, सांदवाडीमध्ये खड्डा खोदून आपण दोघे भाऊ दारूचा व्यवसाय करू व या खड्ड्यात दारू ठेवायची असे म्हणून सत्यवान रामटेके यांच्या घरी नेले तिथे त्याला दारू पाजली व नंतर एका दोरीने त्याचा गळा आवळून हत्या केली.
ज्या खड्ड्यात अनिकेत ला पुरविले तिथे अंकितने फिनाईल, डांबर गोळ्या, मीठ युरिया टाकले होते जेणेकरून मृतदेह लवकर डिकम्पोज व्हावी असे साहित्य टाकण्यात आले.
प्रेयसीसाठी आपल्या सख्ख्या लहान भावाचा खून अंकीतने केला.
या गुन्ह्याचा तपास दुर्गापूर पोलिसांनी 24 तासाच्या आत करीत आरोपीला अटक केली.