Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दूध उत्पादक सहकारी संस्थांच्या सभासदास कर्ज योजना
चंद्रपूर, दि.8 जुलै: शासनाने शेती पिक कर्जा प्रमाणेच अल्प व्याजदरात दुध उत्पादक सह.संस्थांच्या सभासदांस कर्ज देण्याची योजना कार्यान्वित केली आहे. जिल्हयात 10 सहकारी दुध संस्था असून 483 दुध उत्पादक सभासद आहेत.या सर्वानी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कार्यालयाने केले आहे.

शेती कर्ज ज्या प्रमाणे 7 टक्के व्याज दराने अल्प काळासाठी मिळते त्याचप्रमाणे हे कर्ज असून 1 वर्षाच्या आत परतफेड केली तर 3 टक्के व्याज दराची कपात करण्यात येते. सभासदाचा दुग्ध व्यवसाय लक्षात घेऊन बँक या योजनेत कर्ज मर्यादा ठरवून देते. या योजनेत 1.6 लाख पर्यंत कर्ज सभासदाकडील पशुधनावर मिळणार आहे.

ज्या सभासदांना या योजनेचा फायदा घ्यायचा आहे त्यांना त्यांचे गावातील दुग्ध सह.संस्थेच्या सचिवाशी संपर्क करून फॉर्म भरून दस्तावेज दयावेत. यानंतर हे सर्व फार्म प्राथमिक दुध उत्पादक सहकारी संस्थेमार्फेत बँकेत सादर करण्यात येतील. या बाबतील काही अडचणी असल्यास सहाय्यक निंबधक सह.संस्था (दुग्ध) चंद्रपूर यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

Post a comment

0 Comments