परंतु उल्लंघन करणार्याे इसमांवर शुक्रवारी पोलीस दलातर्फे ऑलआऊट ऑपरेशन राबवून कारवाई करण्यात आली. नागरिकांनी आदेशाचे उल्लंघन करणार्या इसमांविरुद्ध मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगचे नियम न पाळणार्या. इसमांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मास्क न वापरणाऱ्या इसमांविरोधात ७४५ प्रकरणे दाखल करण्यात आली असून १ लाख ४८ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
तसेच 'सोशल डिस्टंसिंग'चे पालन न करणाऱ्या करणाऱ्यांविरुद्ध ५४ प्रकरणे दाखल करण्यात आले असून १२२०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर इतर इतर २२५ प्रकरणांमध्ये ४०७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. असा एकूण १०२४ प्रकरणे दाखल करण्यात आले असून एकूण २ लाख ७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.