गुन्हे दाखल झाले तरी चालेल मात्र आम्ही शाळा सुरू होऊ देणार नाही - मनसे


गडचिरोली जिल्हा सोबत चंद्रपुर जिल्ह्यात येत्या ४ ऑगस्ट पासून प्रायोगिक रित्या पूर्ण शाळा सुरू करण्याचा निर्णय माननीय पालकमंत्री साहेबांनी घेतलेला आहे,याच निर्णयाचा विरोध करत आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटून Covid-19 चा चंद्रपुर जिल्ह्यात सुरू असलेला रोज रोज नवीन पोसिटीव्ह पेशन्ट ज्या प्रकारे समोर येत आहे, ती स्थिती पाहत सध्या शाळा सुरू करण्याचा निर्णय अत्यंत निंदनीय आहे,शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावे अन्यथा मनसे तर्फे पालक आणि विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करू यासाठी पत्र देण्यात आले,व जिल्हाधिकारी साहेबांनी सकारात्मक उत्तर दिलेले आहे,यानंतर ही जर शाळा सुरू झाली तर आम्ही स्वतः कायदा हातात घेऊ पण शाळा सुरू करू देणार नाही असा इशारा ही देण्यात आला यावेळी भरत गुप्ता प्रतिमा ठाकूर आणि मनीषा तोकलवार यांची उपस्तिथी होती.

Post a comment

0 Comments