पतीने पत्नीची गळा दाबून केली हत्या
चंद्रपूर,दि.23 : पतीने पत्नीची घरातच गळा दाबून हत्या केली. नंतर शेतात जाऊन पतीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही थरारक घटना वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बंधली गावात घडली. सरला सुभाष धोटे (५०) असे मृतक महिलेचे नाव आहे.पती सुभाष धोटे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दाखल करण्यात आले. कौटुबिक वादातून हत्या झाल्याचे मानले जात आहे.सुभाष धोटे व त्याची पत्नी सरला यांच्यात बुधवारी रात्री वाद झाला.

वादात सुभाषने सरलाची गळा दाबून हत्या केली. घटनेची माहिती वंधली येथील पोलीस पाटलाने वरोरा पोलीस ठाण्याला दिली. वरोरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले तेव्हा पती सुभाष धोटे याने शेतात जावून विष प्राशन केल्याची बाब पुढे आली.

पोलिसांनी सुभाषला तातडीने उपचारार्थ वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.त्यानंतर त्याच्या घराचा पंचानामा केला असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. यावरून पती-पत्नीमध्ये झटापट झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. अशातच सुभाषने पत्नीची गळा दाबून हत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. सुभाष धोटे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथील रुग्णालयत दाखल करण्यात आले आहे.

पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उमेश पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत. सरलाचा गळा दाबण्यात आल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती वरोरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सिद्धार्थ गेडाम यांनी दिली.

Post a comment

0 Comments