Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आ. डॉ. रामदासजी आंबटकर यांच्या वाढदिवसानिमित्त आवश्यक वस्तू आणि ड्रॉइंग बुकचे वाटप
चंद्रपूर :- मा. आ. डॉ. रामदासजी आंबटकर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्ये पूर्णवेळ काम केल्यापासून ते विधान परिषद सदस्य पर्यंत चा प्रवास करताना जी त्यागाची व समर्पणाची भावना मनी जोपासली, कार्यकर्त्याचा आणि हितचिंतकांचा आशीर्वाद आणि समर्थन घेऊन आजपर्यंतचा प्रवास पूर्ण केला असे प्रतिपादन ब्रिजभूषण पाझारे यांनी आपल्या भाषणात केले.
भारतीय जनता पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व विधान परिषद सदस्य मा. आ. डॉ. रामदासजी आंबटकर यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. हेडगेवार सेवा समिती, चंद्रपूर द्वारा संचालित "आश्रय" येथील मुलांना आवश्यक वस्तू आणि ड्रॉइंग बुक वाटप केले व वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
या वेळी डॉ. हेडगेवार सेवा समिती चे अध्यक्ष वसंतरावजी थोटे, जि. प., चंद्रपूर चे माजी सभापती ब्रिजभूषणजी पाझारे, यश बांगडे, कुणाल गुंडावार, स्नेहीत लांजेवार, मनीष पिपरे, संजय पटले, एकनाथ आंबोरकर, राहुल पीजदूरकर, स्वाती देवाळकर, राकेश बोमनवार, रुपेश केळझरकर उपस्थित होते.

Post a comment

0 Comments