चंद्रपूर / प्रतिनिधी
आज दिनांक ३ जुलै रोजी दुपारी 3 वाजता बाबुपेठ येथील भारतीय जनता युवा मोर्चा बाबुपेठ च्या वतिने विज बिलाची होळी करुन ठाकरे सरकारचा निषेध करण्यात आला.
कोरोना काळात विज वितरण कंपनीने मार्च महिण्यापासुन रिडींग न घेता सरासरी विज बिल ग्राहकांना दिले.
त्यामुळे राज्य भरातील जनतेत असंतोष निर्माण झाला. भरमसाठ विज बिल घरगुती ग्राहकांना दिल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे. कोरोना संकटामुळे जनतेला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. तिन महिण्याचे वीज बिल माफ करा अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा बाबुपेठ भाजपा च्या वतिने करण्यात आली आहे.
यावेळी ठाकरे सरकार हाय हाय अशी प्रचंड नारेबाजी व घोषणा बाजी करण्यात आली.
यावेळी पराग मलोडे,कुणाल गुंडावार,हरी निब्रड,आमिष अलमस्त,हिमांशु गादेवार,सुमित निखाडे,राहुल धूर्व,सुनील टिकले,यश दहीवलकर आदि उपस्थित होते