व्हाट्सप व्हिडिओ कॉल द्वारे अनोळखी महिलेकडून ब्लॅकमेलिंग
कोरोनाच्या काळात ,सायबर क्राईम जोरात

चंद्रपूर :- सध्या कोरोनाच्या प्रदूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लोकडाऊन सुरू आहे. लोकडाऊन मुळे शाळा , महाविद्यालय, आणि इतर काही सर्व बंद असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीकडे सर्वांचे काम सुरू झाले आहे.आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन सायबर क्राईम करणारे आपल्या कामाला लोकांपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने पोहचवून लोकांची फसवेगिरी करत आहे. त्यामध्ये व्हाट्सप कॉल द्वारे अनोळखी महीलेकडून ब्लॅकमेल्लिंग चा प्रकार सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.महिलेसोबत मैत्री केलेल्या लोकांना व्हिडीओ कॉल द्वारे आकर्षित करून लोकांकडून हवं ते करून घेते आणि त्याचे विडिओ हे रेकॉर्ड होत असतात. आणि त्या व्हिडीओ द्वारे ती महिला समोरच्या व्यक्तीला ब्लॅकमेल करून त्यांना पैशांचे मागणी करत असते. या प्रकरणात गुन्हेगार महिला सामील आहेत. तेव्हा नागरिकांनी जागृत राहा स्वतःची फसवणूक होण्यापासून व बदनामी होण्यापासून वाचवा. असे आव्हान जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केले आहे.

Post a comment

0 Comments