जंगी दारूपार्टी करून जावयाने केली अख्खी सासुरवाडी क्वारंटाईन
गडचांदूर (जि. चंद्रपूर) : कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सुरुवातीला शहरी भागापुरता मर्यादित असणारा संसर्ग आता ग्रामीण भागात पोहोचला असून, जुलै महिना मोठा रुग्णवाढीचा ठरला आहे. प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांच्या वतीने घालून देण्यात आलेल्या नियमांचे नागरिकांकडून उल्लंघन होत असल्याने वारंवार लॉकडाऊनच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. परंतु नागरिकांनी न सुधारण्याची शपथच घेतल्याचे त्यांच्या वागणुकीवरून दिसून येते. असाच काहीसा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात घडला. जावयाची एक चुकी अख्ख्या सासुरवाडीला चांगलीच महागात पडली. जाणून घ्या पुढे...

सासुरवाडीत दारूची जंगी पार्टी करणे जावयाच्या चांगलेच अंगलट आले.

तसेच त्याला अटकाव न करणाऱ्या सासुरवाडीला याची शिक्षा भोगावी लागली. अख्खी सासुरवाडी क्वारंटाईन करणाऱ्या जावयावर पालिका प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. अमरावती येथून दाखल झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या बेजबाबदार वागण्यामुळे सासुरवाडीतील नागरिकांना कोरोनाची लागण झाली. प्रशासनाची दिशाभूल करणारा कोरोनाबाधित जावई आणि संबंधित कुटुंबातील सदस्यांवर नगरपालिका प्रशासन गडचांदूर यांनी गुन्हा दाखल केला आहे.

Post a comment

0 Comments