ऊर्जानगर बाबुपेठ गोंडपिंपरीच्या करंजी गावातून प्रत्येकी एक कोरोना बाधित


चंद्रपूर बाधितांची संख्या ११३ वर

  ऊर्जा नगर, बाबू पेठ व गोंडपिंपरीच्या करंजी गावातून प्रत्येकी एक बाधित





चंद्रपूर जिल्ह्यात शुक्रवारी ११ बाधितांची एकाच दिवशी भर पडली आहे. सायंकाळी ब्रह्मपुरी तालुक्यातून एकूण ८ पॉझिटिव्ह व रात्री उशिरा चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसर, चंद्रपूर ग्रामीण मधील ऊर्जानगर आणि गोंडपिंपरी तालुक्यातील करंजी येथील प्रत्येकी एक बाधितामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या बाधितांची संख्या ११३ झाली आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०२ होती.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार रात्री उशिरा चंद्रपूर ग्रामीण मधील ऊर्जा नगरातून ५३ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह म्हणून पुढे आला आहे. नाशिक येथून आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आलेल्या ५३ वर्षीय नागरीकाचा काल स्वॅब घेण्यात आला होता. आज पॉझिटिव्ह अहवाल आला आहे.
तर चंद्रपूर महानगराच्या बाबुपेठ परिसरातील संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आलेल्या २० वर्षीय युवकाचा नमुना पॉझिटिव्ह आला आहे. विदेशातून आलेला हा युवक संस्थात्मक अलगीकरणात होता.
तिसरा रुग्ण हा गोंडपिंपरी तालुक्यातील करंजी गावाचा आहे. तेलंगानातून हा युवक परत आल्या नंतर गृह अलगीकरणात होता.काल त्याचा स्वॅब घेण्यात आला. आज तो पॉझिटिव ठरला आहे.
तत्पूर्वी शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास प्राप्त झालेल्या माहितीनुसार ब्रह्मपुरी शहरातील दोन रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. भवानी वार्ड येथील २७ वर्षीय पुरुष व २३ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
अन्य दोन रुग्ण गांगलवाडी ची असून यामध्ये ४९ वर्षीय पुरुष व ३७ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील वांद्रा येथील ३० वर्षीय पुरुष व २५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तालुक्यातील निलज या गावातून देखील तीन वर्षीय बालिका पॉझिटिव्ह ठरली आहे.तर चौगान येथील ३२ वर्षीय पुरुषाचा यामध्ये समावेश आहे.
आजच्या ८ बाधितांपैकी २ बाधित हे अनुक्रमे मुंबई आणि हैदराबाद येथून आले आहे. तर अन्य ६ बाधित जोखमीच्या संपर्कातील आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १०जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) १७जून ( एक बाधित ) १८ जून ( एक बाधित ) २१जून ( एक बाधित ) २२ जून ( एक बाधित ) २३ जून ( एकूण ४ बाधित ) २४ जून ( एक बाधित ) २५ जून ( एकूण १० बाधित ) २६ जून ( एकूण २ बाधित ) २७ जून ( एकूण ७ बाधित ) २८ जून ( एकूण ६ बाधित ) २९ जून ( एकूण ८ बाधित ) ३० जून ( एक बाधित ) १ जुलै ( २ बाधित ) २ जुलै ( २ बाधित ) आणि ३ जुलै ( ११ बाधित ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित ११३ झाले आहेत. आतापर्यत ५६ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ११३ पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता ५७ झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

Post a comment

0 Comments