चंद्रपूर :- कोरोनाशी सर्व मिळून लढू या...!
चंद्रपूर :- प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत अनेक बदल झालेले आहेत. प्रामुख्याने बुद्धिमान मानव आपल्या सुख समृद्धीसाठी वाटेल ते प्रयोग करीत आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे प्रचंड प्रगती करून निसर्गावर मात केलेली आहे. परंतु पर्यावरण असंतुलन होऊन वेगवेगळ्या हानी होत असतानाही दिसत आहे. भूकंप, चक्रीवादळ, सुनामी, महापूर आणि प्रदूषणामुळे निर्माण झालेले वेगवेगळे रोग यामुळे मानव मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडलेला आहे.सध्या कोरोनाचा प्रकोप आहे.

महाराष्ट्र राज्याचे विचार केले असता लाखोच्या संख्येने कोविड-19 च्या रुग्णावर उपचार सुरु आहे. कोविड-19 हा संसर्गजन्य विषाणू असल्यामुळे लोकांना केव्हा संसर्ग होईल हे कळणार सुध्दा नाही. त्यामुळे स्वतःच स्वतःची काळजी घेणे हे काळाची गरज झालेली आहे. थोडक्यात कोविड-19 विषाणू नेमके आहे तरी काय ते जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

कोरोना विषाणू काय आहे:

2003 मध्ये आढळलेला सार्स हा आजार किंवा 2012 मध्ये आढळलेला मर्स हा आजार हे सुध्दा कोरोना विषाणूमुळे होणारे आजार आहेत. कोरोना हा विषाणू प्राणी जगतातून मानवाकडे आलेला विषाणू आहे. तो मुख्यत्वे वटवाघळा मध्ये आढळतो. बेसुमार जंगलतोड,वाढते शहरीकरण, कच्चे मांस खाण्याची सवय इत्यादी कारणांमुळे प्राणी जगतातील सुक्ष्म जीव मानवामध्ये प्रवेश करतात.

कोरोना विषाणू आजाराची लक्षणे:

ही मुख्यत्वे श्वसन संस्थेशी निगडित असतात.ती सर्वसाधारण इन्फ्लूएन्झा आजारासारखीच असतात.सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, ताप, न्युमोनिया, काही वेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे आढळतात.

हा आजार शिंकण्या-खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातून पसरतो. याशिवाय शिकण्या,खोकल्यातून उडालेले थेंब आजूबाजूला पृष्ठभागावर पडतात.अशा पृष्ठभागाला स्पर्श केल्याने हे थेंब हाताला चिकटतात हाताने वारंवार चेहरा, डोळे, नाक चोळण्याच्या सवयीमुळे देखील हा आजार पसरू शकतो. कोरोना विषाणू आजारावर कोणतेही औषध अथवा लस उपलब्ध नाही. रुग्णास त्याच्या लक्षणानुसार उपचार केले जातात.

कोरोना आजार होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी:

श्वसन संस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घेणे.हात वारंवार धुणे.शिंकताना खोकताना नाकातोंडावर रुमाल अथवा टिश्यू पेपर धरणे,अर्थवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ नये.फळे,भाज्या न धुता खाऊ नयेत.वरील सर्व कोविड -19 ची माहिती लक्षात घेता प्रत्येक व्यक्तीने स्वच्छता व स्वतःची योग्य काळजी घेतली तर इतर आजार व कोविड -19 वर सहज मात करता येऊ शकतो.

आरोग्य सेतू हे भारत सरकार द्वारे विकसित डिजिटल सेवा पुरवणारे मोबाईल एप्लिकेशन आहे. कोविड-19 संबधित आरोग्य सेवा भारताच्या नागरिकापर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने बनविले आहे.ज्यामधे लोकांना त्यांच्या कोविड 19 संक्रमणाच्या संभाव्य जोखीम बाबत कळविणे आणि निरोगी राहण्यासाठी अमलात आणायच्या सर्वोतम पद्धती तसेच कोविड- 19 महामारीशी संबंधित लागू व निवडक वैद्यकीय अडव्हायजरी पुरविणे याचा समावेश होतो.भारतात पसरत चाललेल्या कोरोना व्हायरस महामारी रोखण्यासाठी आरोग्य सेतू आपला कॉमन ब्रिज आहे.आरोग्य सेतू हे तुम्ही सामान्य कृती करीत असतांना तुम्ही ज्या व्यक्तीच्या संपर्कात आले असाल त्या सर्वाचे तपशील रेकार्ड करण्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वापरते आणि जर त्यापैकी कोणाचेही नंतर कोविड 19 पॉझिटिव्ह म्हणून निदान तर तुम्हाला कळविले जाईल आणि तुमच्यासाठी सक्रिय वैद्यकिय मदत दिली जाणार आहे. तसेच आरोग्य सेतू सध्या 12 भाषांमध्ये उपलब्ध असून भारताच्या सर्व 22 अनुसूचित भाषामध्ये उपलब्ध होणार आहे. म्हणजेच सरकार कोविड 19 ला नियंत्रणात आणण्यासाठी वेळोवळी प्रयत्न करीत आहे.

आपण सर्व जवळपास चार महिन्यांपासून कोरोना विषाणुशी झुंज देत आहोत. लॉकडाऊनच्या काळात सर्वांची खूप अवस्था झालेली होती व ती आताही कायम आहे. अनेकांचा रोजगार बुडाला,उपासमार सुरू झाली.कामावर गेलेले मजूर वेगवेगळ्या राज्यात अडकले. रेल्वे, बस,विमान सेवा पूर्णतः बंद करण्यात आली.या सर्व घडामोडी मुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे बिघडली पण अनेकांचा जीव वाचला हे विसरता कामा नये.

जगायचे असेल तर अन्न आवश्यक आहे. अन्नधान्य आपला शेतकरी पिकवितो. मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात शेती पिकविल्या जाते.99.9% खेड्यामध्ये कोविड 19 चा संसर्ग नाही त्यामुळे शेतात काम करताना कोणताही संसर्ग होऊ शकणार नाही. तसेच शेतात फार कमी मजूर काम करीत असतात त्यामुळे सहज एक मीटर अंतर ठेवून काम करता येऊ शकतो.

पेरणी, रोवणे, हे सर्व कामे सहज केली जाऊ शकतात. त्याचप्रमाणे आधुनिक यंत्राचा वापर करून शेती केल्या जाते, त्यामुळे कोविड 19 चा संसर्ग होणार नाही व शेती पिकविता सुध्दा येईल तेव्हा शेतकरी बांधवांनो सुरक्षित अंतर, स्वच्छता, मास्कचा वापर व काळजी घेतली तर नक्कीच शेती फुलविता येऊ शकते.

शिक्षण प्रक्रिया तेवढी महत्वाची आहे. यावर्षी प्राथमिक,माध्यमिक,पदवी परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आले.जीवन अमूल्य आहे ते वारंवार प्राप्त होत नाही. त्यामुळेच शिक्षण मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याचे दिसून येतो.

वरील दोन उदाहरणाद्वारे एवढेच सांगायचे आहे की, जिथे कोविड 19 चा रुग्ण आहे. तिथे वेळोवेळी सावधगिरी बाळगून कार्य केले पाहिजे.जिथे एकही कोविड-19 चा रुग्ण नाही तिथे कुणालाही होऊ नये म्हणून वारंवार कोविड 19 ची सविस्तर माहिती पटवून द्यावे.बाहेर जिल्हा मधून आलेल्या नागरिकाने स्वतः आरोग्य नियंत्रण केंद्रात जाऊन निदान करावे.सरकारी यंत्रणा,आरोग्य विभाग, पोलीस विभाग अहोरात्र काम करीत आहे.त्यांना अवश्य मदत करावे हा एक लढा आहे त्याला मुक्त करण्यासाठी सर्व भारतीय नागरिक मिळून लढूयात आपलाच विजय होऊन परत सुखसमृद्धी चे आनंदाचे दिवस येतील अशीच मंगलमय आशा करतो.

नरेंद गुरुदास कन्नाके
महाराष्ट्र राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक
नेहरू विद्यालय शेगाव (बूज) तालुका: वरोरा

Post a comment

0 Comments