Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दारू तस्करांविरूध्द चंद्रपुर पोलीसांची विशेष कार्यवाही
१ कोटी ६६ लक्ष २० हजार रूपयेचा मुददेमाल हस्तगत

दिनांक २१/०७/२०२० ते २७/ ०७/२०२० रोजी पर्यंत चंद्रपुर जिल्हयात
पोलीस अधीक्षक चंद्रपुर डॉ.श्री. महेश्वर रेडडी यांचे मार्गदर्शनात दारूतस्कांवर आळा
घालण्यासाठी विशेष मोहिम राबवुन पोलीस स्टेशन अंतर्गत वेगवेगळे पथके तयार
करून अवैध दारू तस्कराविरूध्द नाकेबंदी आणि छापे टाकुन देशी विदेशी दारूच्या
५११६१ बॉटल आणि वाहने असा एकुण किं. ०१ कोटी ६६ लक्ष २० हजार
रूपयेचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरबाबत पोलीस स्टेशन येथे १३
गुन्हे नोंद करण्यात आले असुन १८ आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.
यामध्ये खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.

दिनांक २१/०७/२०२० रोजी पोलीस स्टेशन पड़ोली येथील पोलीस पथकाने
मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सैनिक पेट्रोलपंपाजवळ एका दुचाकीस ताब्यात घेवुन
एकुण १५० बाँटल देशी दारूचा माल किं. १५,०००/-आणि वाहन असा एकुण
३०,०००/-रू चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरच्या गुन्हयात ०२
आरोपीस अटक करण्यात आली आहे. तसेच मौजा साखरवाही गावजवळ एका
चारचाकी टाटा सफारी वाहनास ताब्यात घेवुन वाहनातुन १००० बॉटल देशी दारूचा
माल किं. १,००,०००/-रू आणि वाहन किं. ५,००,०० ०/-रू असा एकुण
६,००,०००/-रू चा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्हा ०१
आरोपी अटक करण्यात आला आहे.
दिनांक २३/०७/२०२० रोजी पोलीस स्टेशन मुल येथील पोलीस पथकाने गोपनीय
माहितीवरून मौजा बेलघाटा जवळ नाकेबंदी करून दोन वाहनातुन ११०० बॉटल देशी
दारूचा माल आणि मोबाईल फोन असा एकुण ६,३२,०००/- रू चा मुददेमाल जप्त
करण्यात आला आहे. सदरच्या गुन्हयात ४ आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.
१) दिनांक २३/०७/ २०२० रोजी पोलीस स्टेशन वरोरा येथील पोलीस पथकाने
मांगली गावाजवळ एका अपघातग्रस्त बोलेरो पिक अप वाहनास ताब्यात घेवुन
वाहनाची पाहणी केली असता, वाहनात ऑफीसर चाँईस कंपनीची विदेशी दारू
२८०० बॉटल किं. ५,६०,०००/-रू आणि नंबर ०१ कंपनीची विदेशी दारू ४३२
बॉटल किं. १,७२,८००/-रू आणि एक टाटा बोलेरो पिकअप वाहन असा एकुण
१४,३२,०००/-रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.


२) तसेच मौजा माढेळी येथे एका बंद घरात मिळालेल्या गोपनीय माहितीवरून छापा
टाकला असता २४९५ बॉँटल देशी दारू किं. २,४९,०००/- रू चा मुददेमाल
हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्हयात ०१ आरोपीस अटक करण्यात आली
आहे. ३) तसेच वरोरा पोलीसांनी गोपनीय माहिती वरून नागरी ते माढेली रोडवर
नाकेबंदी दरम्यान एका चारचाकी वाहनास ताब्यात घेवुन वाहनातुन अवैध देशी दारूचे
३००० बॉटल किं. ३,००,०००/-रू आणि वाहन असा एकुण १०,००,०००/-रू
चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २५/०७/२०२० रोजी पोलीस स्टेशन राजुरा येथील पोलीस पथकाने
गोपनीय माहितीवरून एका ट्रेलर ट्रक एमएच ३४ एबी ७२२८ वाहनास ताब्यात
घेवुन वाहनातुन १८०० बॉटल देशी दारूचा माल, एक वाहन आणि मोबाईल फोन
असा एकुण २६,९०,०००/-रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.


१)दिनांक २५/०७/२०२० रोजी पोलीस स्टेशन बल्लारशाह येथील पोलीस पथकाने
गोपनीय माहितीवरून नविन दहेली येथील एका शेतात छापा टाकला असता ६२००
बॉटल देशी दारूचा माल आणि मोबाईल फोन असा एकुण ९,३५,०००/-रू चा
मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदरच्या गुन्हयात ०२ आरोपींना अटक
करण्यात आली आहे.२) तसेच भगतसिंग वार्ड बल्लारशाह येथील मॅक्झिन जवळ
छापा टाकला असता १०००० बॉटल देशी दारू किं. १५,००,०००/-रू दोन
दुचाकी आणि एक ऑटो असा एकुण १६,६०,०००/- रू चा मुददेमाल जप्त
करण्यात आला आहे. सदर गुन्हयात ०२ आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.
दिनांक २६/०७/२०२० रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गडचांदुर येथील
पोलीस पथकास संयुक्त कार्यवाही करून
६,३३,०००/-रू, दोन चारचाकी वाहन (महिंद्रा स्कॉर्पिओ व हयुंडाई केटा) आणि
५ मोबाईल फोन असा एकुण २५,२०,६००/-रू चा मुददेमाल जप्त करण्यात
आला आहे. सदरच्या गुन्हयात एकुण ०५ आरोपीस अटक करण्यात आली आहे.
दिनांक २६/०७/२०२० रोजी पोलीस स्टेशन भद्रावती येथील पोलीसांनी
मिळालेल्या गोपनीय माहितीवरून भद्रावती टप्पा येथे एका चारचाकी होंडा सिटी
वाहनास ताब्यात घेवुन वाहनातुन ऑफीसर चाईस कंपनीची विदेशी दारू ३२००
बॉटल किं. ४,८०,०००/-रू आणि एक होंडा सिटी वाहन किं. १०,००,०००/-रू
असा एकुण १४,८०,०००/-रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २६/०७/२०२० रोजी पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर पोलीसांनी मिळालेल्या
गोपनीय माहितीवरून पठाणपुरा ते आरवट रोडवर एका चारचाकी टाटा सुमो वाहनास
ताब्यात घेवुन वाहनातुन १५०० बॉटल देशी दारू किं. १,५०,०००/-रू चा माल
आणि एक वाहन किं. ६,००,०००/-रू असा एकुण
मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयात ०१ आरोपीस अटक करण्यात
आली आहे.


६६०० बॉटल देशी दारूचा माल
७,५०,०००/-रू चा
पोलीस स्टेशन नागभिड येथील पोलीस पथकाने गोपनीय माहितीवरून विलम गावात
नाकेबंदी करून एका चारचाकी स्कॉर्पिओ वाहनास ताब्यात घेवुन वाहनातुन ३६००
बॉटल देशी दारूचा माल आणि एक दुचाकी असा एकुण ७,९५,२००/-रू चा
मुददेमाल जप्त केला आहे.
दिनांक २८/०७/२०२० रोजी पोलीस स्टेशन सिंदेवाही येथील पोलीस पथकाने
गोपनीय माहितीवरून सिंदेवाही मुल रोडवर नाकेबंदी करून मॅकडॉल नंबर ०१
कंपनीची विदेशी दारू १५८४ बॉटल, देशी दारू ५७०० बॉटल आणि एक
चारचाकही वाहन असा एकुण १८,४६,२००/- रू चा मुददेमाल जप्त करण्यात
आला आहे.

Post a comment

0 Comments