तक्रारीसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाशी संपर्क करा


चंद्रपूर, दि. 6 जुलै: रुग्णवाहिकांचे भाडे दर निश्‍चितीसाठी जिल्‍हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत रुग्णवाहिकांचे भाडे दर निश्चित करण्यात आलेले आहे. यापेक्षा अधिक भाडे दर जनतेने देऊ नये, याबाबत काही तक्रारी असल्यास लेखी स्वरुपात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर कार्यालयास सादर करण्यात याव्यात, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

असे असणार रुग्णवाहिकांची भाडे दर

25 किलो मीटर अथवा दोन तासा करिता तसेच प्रति किलोमीटर याप्रमाणे भाडे दर निश्चित केलेले आहे. मारुती व्हॅन या वाहनाचा 25 किलो मीटर अथवा दोन तासा करिता रुपये 600 तर 12 रुपये प्रति किलो मीटर भाडे दर निश्‍चित केलेला आहे. टाटा सुमो व मॅटॅडोर सदृश्य कंपनीने बांधणी केलेली वाहनाचा 25 किलो मीटर अथवा दोन तासा करिता रुपये 700 तर 12 रुपये प्रति किलो मीटर भाडे दर निश्‍चित केलेला आहे.

टाटा 407, स्वराज माझदा आदींच्या बांधणी केलेली वाहने, विंगर, टेम्पो ट्रॅव्हलर वाहनाचा 25 किलो मीटर अथवा दोन तासा करिता रुपये 800 तर 18 रुपये प्रति किलो मीटर भाडे दर निश्‍चित केलेला आहे. आयसीयू अथवा वातानुकूलित वाहनाचा 25 किलो मीटर अथवा दोन तासा करिता रुपये 1 हजार तर 22 रुपये प्रति किलो मीटर भाडे दर निश्‍चित केलेला आहे.

Post a comment

0 Comments