रामनगर परिसरात सिंधी कॉलनीत नगरसेवक रवी आसवानी यांचे घर आहे.सध्या चंद्रपुरात टाळेबंदी आहे. त्यामुळे कुणी घराबाहेर पडत नाही. दुपारी एक वाजताच्या सुमाराला या वस्तीत शुकशुकाट होता. बहुतांश कुटुंबीय घरात होते. आसवानीसुद्धा दुपारी कुटुंबीयांसह विश्राम करीत होते. घरात त्यांचा मुलगा आणि पत्नी होती. दरम्यान 1.15 मिनिटांनी अचानक दोन पोलिस आसवानी यांच्या घरी पोहोचले. तुम्ही दारूची अवैध विक्री कधीपासून सुरू केली, अशी थेट विचारणा आसवानी यांना केली. तेव्हा सारेच कुटुंबीय चक्रावले. पोलिसांनी त्यांच्या घराच्या वॉलकंपाउडवर असलेली विदेशी दारूची पेटी आसवानी यांना दाखविली. तोपर्यंत रामनगरचे आणखी काही पोलिस तिथे पोहोचले. आसवानी यांनीही नमते घेतले नाही. त्यांनीही पोलिसांना खडे बोल सुनावले. दरम्यान, पोलिस पोहोचण्याच्या काही मिनिटाअगोदर एक महिला दाखला मागण्यासाठी आसवानी यांच्या घरी आली होती. तेव्हाच आसवानी यांनी घराचे द्वार उघडले. त्यावेळी आसवानी घरातच होते. ती आल्यानंतरच त्यांनी दार उघडले असे सांगितले. त्यानंतर पोलिस नरमले. वॉलकंपाउडवर कुणीतरी जाणीवपूर्वक ती दारूची पेटी ठेवली, अशी त्यांनी खात्री पटली. दुचाकीवर कुणीतरी दारू घेऊन आसवानी यांच्या घराकडे घुसला आणि त्यानेच ती दारूची पेटी वॉलकंपाऊडवर ठेवली, असे पोलिसांनी मान्य केले. त्यानंतर दारू घेऊन ते माघारी फिरले. मात्र, या घटनेमुळे आसवानी कुटुंबीय चांगलेच हादरले आहे. आसवानी यांचे घर गल्लीत शेवटचे आहे. त्यानंतर जायला रस्ता नाही. आल्या मार्गानेच एखाद्याला परत जावे लागले. आसवानी यांच्या रांगेत आधी पाच ते सहा घर आहे. तिथे दारू न ठेवता आसवानी यांच्याच घराच्या वॉलकंपाऊडवर दारू ठेवली कशी? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
रवी आसवानी, नगरसेवक, मनपा चंद्रपूर
माझ्या कुटुंबीयांना फसविण्यासाठी जाणीवपूर्वक विदेशी दारूची पेटी वॉलकंपाऊडवर ठेवली. पोलिस घरी पोहचले. सुदैवाने त्यांची खात्री पटली आणि ते माघारी फिरले. याप्रकरणाची चौकशी करून आरोपीला पोलिसांनी पकडायला हवे.
0 Comments