चंद्रपूर जिल्ह्यात 9 दिवसांची चिमुकली कोरोना पॉझिटिव्ह






चंद्रपूर :- आज पुढे आलेल्या एकूण २८ बाधितामध्ये सायंकाळी १० आणखी पॉझिटीव्ह पुढे आले आहेत. या १० नागरिकांची अँटीजेन चाचणी करण्यात आली आहे.
रात्री ८.३० च्या सुमारास आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार नागभीड तालुक्यातून सहा बाधित पुढे आले आहेत. या सहा पैकी पाच बाधित हे नागभिड शहरातील आहेत. नागभीड येथे यापूर्वी आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील हे पाचही बाधित आहेत. सहावा बाधित हा नागभीड तालुक्यातीलच सावरगाव येथील नागरिक आहे.


रात्रीच्या १० बाधितांपैकी सात वाजताच्या सुमारास ४ बाधित पुढे आले आहेत. यामध्ये कोरपणा येथील 36 वर्षीय व्यक्तीचा समावेश असून वार्ड नंबर 3 मधील संपर्कातील हा बाधित आहे. बल्लारपूर शहरातील रेल्वे कॉलनी बायपास येथील तीन रुग्ण पुढे आले आहेत. सरासरी 40 वयोगटातील हे तीनही रुग्ण पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातून बाधित झाले आहेत.


तत्पूर्वी सायंकाळपर्यंत १८ बाधित पुढे आले होते. यामध्ये कोरपना तालुक्यातील पालगाव येथील यापूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील ३४ वर्षीय पुरुष व ३ वर्षीय बालकाचा समावेश आहे.
राजुरा पोलीस स्थानकातील ४६ वर्षीय जवान पॉझिटिव्ह ठरला आहे. या ठिकाणच्या यापूर्वीच्या बाधितांच्या संपर्कातील हा जवान असल्याचे समजते.


राजुरा येथील तेलंगाना राज्यातून प्रवास केलेली 19 वर्षीय युवती तपासणीअंती पॉझिटिव्ह निघाली आहे.


ब्रह्मपुरी तालुक्यातील वांढरी येथील २४ वर्षीय पुरुष संपर्कातून बाधीत ठरला आहे. चेन्नई येथून याठिकाणी आलेला यापूर्वीच्या एक पॉझिटिव्हच्या हा युवक संपर्कात आहे.
नागभीड तालुक्यातील किरमिटी मेंढा येथील 21 वर्षीय युवक बाधित ठरला आहे. दिल्ली येथून आल्यानंतर हा युवक संस्थात्मक अलगीकरणात होता.


चंद्रपूर शहरातील पठाणपुरा सावरी बंगला परिसरातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 26 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह ठरला आहे.
ब्रह्मपुरी येथील कुडेसाघली 24 वर्षीय पुरुष यापूर्वीच्या एका बाधितांच्या संपर्कातून पॉझिटिव्ह ठरला आहे.


कागज नगर येथून प्रवास केला असल्याची नोंद असलेला सिंदेवाही तालुक्यातील 23 वर्षीय पुरुष पॉझिटीव्ह ठरला आहे.


अफगाणिस्तान परत आल्यानंतर श्वसनाचा आजार जाणवू लागल्यामुळे दुर्गापुर वार्ड, चंदू बाबा गेट जवळील 49 वर्षीय व 20 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.
याशिवाय नागभीड येथील वार्ड क्रमांक सहा मधील काल निघालेल्या दोन पॉझिटिव्हच्या संपर्कातील 22 व १२ वर्षीय दोन पुरुष व २० वर्षीय महिला अँटीजेन चाचणीमध्ये पॉझिटिव्ह ठरली आहे.
नागभीड येथील सिनेमा टॉकीज परिसरातील 60 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे.
राजुरा तालुक्यातील चुनाळा गावातील 42 वर्षीय पुरुष ,चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आला आहे.
चिमूर तालुक्यातील ब्राह्मणी येथील 31 वर्षीय महिला व केवळ नऊ दिवसांची मुलगी अँन्टीजेन चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आली आहे.
चंद्रपूर येथील बागडे हाऊस वार्ड नंबर १६ मधील ३२ वर्षीय पुरुष चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आला आहे.

Post a comment

0 Comments