Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

चंद्रपूर जिल्ह्यात आज 25 कोरोना बाधितांची भर Corona-positive




चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४२८ झाली आहे. २६१ बाधित बरे झाले असून १६५ बाधितावर उपचार सुरू आहेत. तेलंगाना येथील एका महिलेचा २४ जुलैला मृत्यू झाला. तिचा स्वॅप चंद्रपूर येथे पॉझिटिव्ह आला होता. याशिवाय एका महिलेला कोरोना शिवाय अन्य आजाराच्या गंभीरते मुळे नागपूरला हलविण्यात आले आहे. या दोन पॉझिटिव्हमुळे चंद्रपूर जिल्ह्याची आतापर्यंतची एकूण पॉझिटिव्ह संख्या ( ४२६ + २ ) ४२८ झाली आहे.

सायंकाळी पुढे आलेल्या ५ बाधितामध्ये राजुरा येथील पोलिस वसाहतींमध्ये राहणाऱ्या ५३ वर्षीय पोलिस जवानाचा समावेश आहे. त्यांचा स्वॅब २७ जुलैला घेण्यात आला होता. टेस्टमध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह ठरला आहे.

माजरी येथील रहिवासी असणाऱ्या रामागुंडम तेलंगाना येथून परत आलेल्या ३५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संस्थात्मक अलगीकरणात त्यांची चाचणी करण्यात आली.

बल्लारपूर येथील गणपती वार्डमध्ये निवासी असणाऱ्या २८ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पाटणा समस्तपूर येथून त्यांनी प्रवास केला होता.

घुग्घुस शहरातील रहिवासी असणाऱ्या ६५ वर्षीय महिलेचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. ही महिला संपर्कातून बाधित झाली आहे.

चिमूर येथील बामणी या गावचे रहिवासी असणारे ३३ वर्षीय व्यक्तीदेखील अँटीजन चाचणीमध्ये पॉझिटिव्ह ठरली आहे. त्यांना श्वसनाचा संदर्भात आजार होता.

तत्पूर्वी ,आज पुढे आलेल्या १८ बाधितांमध्ये सिंदेवाही तालुका ( ६ ) गडचांदूर (३ ) चिमूर तालुका (३ ) बल्लारपूर शहर ( २ ) चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील (३ ) व अन्य राज्यातील एका बाधिताचा समावेश आहे. काल सायंकाळपासून आज सहा वाजेपर्यंत एकूण १८ बाधित पुढे आले आहेत.
त्यामुळे कालपर्यंत ४०३ असणारी बाधितांची संख्या आज ४२१ झाली आहे.

काल सायंकाळपासून आज सायंकाळपर्यंत पुढे आलेल्या बाधितामध्ये बल्लारपूर शहरातील कागज नगर येथून परतलेल्या २८ वर्षीय युवकांचा समावेश आहे. बाहेरून आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात ठेवलेल्या युवकाचा २५ जुलै रोजी स्वॅब घेण्यात आला होता.

दुसरा युवक ३० वर्षीय असून वाराणसी येथून आला असल्याची नोंद आहे. वाराणसी वरून आल्यानंतर गृह अलगीकरणात ठेवलेल्या युवकाचा २५ जुलै रोजी स्वॅब घेण्यात आला होता.
चिमूर तालुक्यातील वडाळा पैकु येथील टीचर कॉलनीत राहणाऱ्या पती-पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एका विवाह सोहळ्यासाठी या दोघांनी यवतमाळ येथून प्रवास केला होता.

चिमूर येथील इंदिरा नगर चेंबूर येथील 28 वर्षीय महिला धामणगाव येथून प्रवास करून परत आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात होती. पॉझिटिव्ह ठरली आहे.
नागपूर येथून प्रवास केल्याची नोंद असलेल्या सिंदेवाई येथील ४५ वर्षीय महिला व तिचे २४ व १९ वर्षीय मुले पॉझिटिव्ह आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies