घुग्घुस येथील साखरवाही रोड बेलसनी फाटा येथे घुग्घूस पोलिसांनी दारू तस्करांना २ लाख ५० हजार रूपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. आरोपींवर कलम 65 (अ) ८३ मदाका कायद्यांतर्गत घटनास्थळीच अटक करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, घुग्गूस पोलिसांनी साखरवाही रोड बेलसनी फाटा येथे शनिवार दि. 4 जुलै रोजी 4.30 ते 5 वाजताचे दरम्यान TATA कम्पनिच्या पांढऱ्या रंगाच्या INDICA गाडीमध्ये (क्र. MH.34-K-8770) दोन मोठ्या प्लास्टिक चुंगड्यामध्ये (प्रकरणी चुंगडी 400 नग) असे एकुण ८०० नग व एक लहान प्लॉस्टीक चुंगडी मध्ये २०० मध्ये असे एकुण १००० नग चापट प्लॉस्टिकच्या शिश्या ज्याचा वर रॉकेट देशी दारु संत्रा प्रवरा डिस्टलरी प्रवरा नगर प्रत्येकी ९० मि.ली ने भरलेल्या कंपनी सिलबंद शिश्या (अंदाजे किंमत 50 हजार रूपये) जप्त केल्या. या तस्करीसाठी वापरले गेले वाहन अंदाजे (किंमत २ लाख रुपये) असा एकंदर 2 लाखांचा मुद्देमालासह आरोपी प्रेमसिंग उर्फ सोनु दारासिंग टॉक (२६ वर्षे) रा,म्हातारदेवी रोड महाकाली नगरी जवळ, घुग्घुस ता. जि.चंद्रपुर व तोसीफ चॉन्दखा पठान (२४ वर्ष) गुप्ता किराणा जवळ घुग्घुस ता. जि. चंद्रपूर यांना घटनास्थळावर अटक करुन आरोपींवर कलम 65 (अ) ८३ मदाका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पो. नि. राहुल गांगोर्डे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहा. फौजदार गौरीशंकर आमटे, नापोशि सचिन बोरकर, विनोद वानकर,सचिन अल्लेवार, सुधिर मत्ते यांनी केली. पुढील तपास गुन्हे शाखेचे सहा. फौजदार गौरीशंकर आमटे करीत आहे.