आज दुपारनंतर 17 कोरूना बाधित रुग्णांची नोंदकोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी चंद्रपूर शहर, ऊर्जानगर व दुर्गापूर या भागात १७ जुलै ते २६ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर केला आहे.आज दुपार पर्यंत जिल्ह्यात नवीन १७ कोरोना बाधित आढळून आले.

त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या २६० वर पोहोचली आहे. आतापर्यंत अक्टिव्ह रुग्णांची संख्या ११२ असून पूर्णपणे बरे झालेले रुग्णांची संख्या १४८ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील कोविड सेंटरची संख्या वाढविण्यासाठी नवीन इमारती तयार ठेवण्याचीही तयारी प्रशासना द्वारे करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

काल रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार 17 व आज दुपारपर्यंत प्राप्त अहवालानुसार 15 असे एकुण 32 रुग्ण 24 तासाच्या आत उघडकीस आल्याने प्रशासन अधिकच सतर्क झाले आहे.

Post a comment

0 Comments