Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

आज आणखी 10 कोरोना बाधितांची नोंद
चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या २२८


उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या ९८
१३० बाधित कोरोनातून बरे

चंद्रपूर,दि. १७ जुलै: जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या २२८ झाली आहे. यापैकी १३० बाधित कोरोनातून बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ९८ बाधितांवर उपचार सुरू आहे. यापैकी १७ नागरिक जिल्ह्याबाहेरील बाधित असून यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाचे ११ जवान व ६ जन अन्य राज्याचे रहिवासी आहेत.
आरोग्य विभागाने दुपारी दिलेल्या माहितीनुसार कालपर्यंत २१८ असणारी संख्या आज १० बाधिताची भर पडल्यामुळे २२८ झाली आहे. १० बाधितामध्ये चंद्रपूर शहरासह, तालुक्याच्या व ग्रामीण भागातील नागरिकांचा सहभाग आहे.यामध्ये चंद्रपूर शहरातील २ नगरपरिषद क्षेत्रांमधील २ व ग्रामीण भागातील ६ बाधितांचा समावेश आहे.
चंद्रपूर शहरातील खोतवाडी वार्ड रामदेव बाबा मंदिर चौकातील ४९ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांचा १४ जुलै रोजी स्वॅब घेण्यात आला होता.
चंद्रपूर शहरातील दुसरा पॉझिटिव्ह आरोग्य सेतू ॲपने पुढे आणला आहे. व्यवसायाने ड्रायव्हर असणाऱ्या बीजेएम कारमेल अकॅडमी जवळील तुकूम परिसरातील ५० वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह ठरला आहे. जालना येथे प्रवास केल्याची नोंद आहे. त्यांच्या कुटुंबातील अन्य व्यक्ती गृह अलगीकरणात ठेवण्यात आली आहे.
खुटाळा चंद्रपूर येथील एका कारखान्यात काम करणाऱ्या ५६ वर्षीय कामगारांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या कामगारांची पत्नी झारखंड वरून १४ जुलै रोजी परत आल्याची नोंद आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नांदगाव पोळे येथील रहिवासी असणाऱ्या २६ वर्षीय नागरिकाचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. हैद्राबाद येथून १० जुलै रोजी कारने चंद्रपूर जिल्हयात आल्यानंतर एका खासगी हॉटेलमध्ये ते संस्थात्मक अलगीकरणात होते.
ऊर्जानगर परिसरात राहणाऱ्या ४६ वर्षीय अभियंत्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नागपूर कोराडी येथून १० जुलै रोजी परत आलेल्या अभियंत्याला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. १४ जुलैला त्यांचा स्वॅब घेण्यात आला.

ऊर्जानगर येथील कोनाडी वार्ड परिसरातील रहिवासी असणाऱ्या ३८ वर्षीय महिलेचा स्वॅब पॉझिटीव्ह आला आहे.
तसेच ऊर्जानगर परिसरातील नेरी वार्ड येथे रहिवासी असणाऱ्या आणखी एका ३७ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
राजुरा नगरपालिका क्षेत्रातील नदी मोहल्ला परिसरातील एका कुटुंबातील बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बिहारच्या धनपूर येथून प्रवास केल्याची नोंद या परिवाराची आहे. त्या परिवारातील सर्वांचे स्वॅब १५ जुलै रोजी घेण्यात आले होते
वरोरा तालुक्यातील आमडी येथील रहिवासी असणाऱ्या २४ वर्षाच्या युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. १२ जुलै रोजी हा युवक पुणे येथून बसने प्रवास करीत आपल्या गावाला पोहचला होता. आल्यापासून तो गृह अलगीकरणात होता.
ब्रह्मपुरी तालुक्यातील रानबोथली येथील रहिवासी असणारा ३३ वर्षीय केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान पॉझिटिव्ह ठरला आहे. १२ जुलै रोजी ब्रह्मपुरी येथे आल्यानंतर १५ जुलै रोजी त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. तो पॉझिटिव्ह ठरला आहे.
आतापर्यंतचे कोरोना बाधीतांचे विवरण :
चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे ( एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण 7 बाधित), 24 मे ( एकूण 2 बाधित), 25 मे ( एक बाधित ), 31 मे ( एक बाधित ), 2 जून (एक बाधित), 4 जून (दोन बाधित), 5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित), 7 जून ( 11 बाधित),9 जून (एकुण 3 बाधित), 10 जून ( एक बाधित), 13 जून ( एक बाधित), 14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित), 16 जून ( एकुण 5 बाधित), 17 जून ( एक बाधित), 18 जून ( एक बाधित), 21 जून (एक बाधित), 22 जून (एक बाधित), 23 जून (एकूण बाधित चार ), 24 जून (एक बाधित), 25 जून (एकूण 10 बाधित),26 जून (एकूण दोन बाधित), 27 जून (एकूण 7 बाधित), 28 जून (एकूण 6 बाधित), 29 जून (एकूण 8 बाधित), 30 जून (एक बाधित), 1 जूलै (एकूण दोन बाधित), 2 जुलै ( 4 बाधित ), 3 जुलै ( एकूण 11 बाधित ), 4 जुलै ( एकूण 5 बाधित ), 5 जुलै ( एकूण 3 ‌ बाधित ), 6 जुलै ( एकूण सात बाधित ), 8 जुलै ( एकूण पाच बाधित ), 9 जुलै ( एकूण 14 बाधित ), 10 जुलै ( एकूण 12 बाधित ), 11 जुलै ( एकूण 7 बाधित ),12 जुलै ( एकूण 18 बाधित ),13 जुलै ( एकूण 11 बाधित ), 14 जुलै ( एकूण 10 बाधित ), 15 जुलै ( एकूण 5 बाधित ), 16 जुलै ( एकूण 5 बाधित ) व 17 जुलै ( एकूण 10 बाधित ) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित 228 झाले आहेत. आतापर्यत 130 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 228 पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता 98 झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies