चंद्रपूर :- जागतिक पर्यावरण दिन आणि वटपौर्णिमा एकाच दिवशी आल्या. या निमित्त 5 जून रोजी' जागतिक पर्यावरण दिन ' आणि ' वटपौर्णिमा ' या दिनानिमित्त ' सरकार नगर योगा डान्स ग्रूप आणि अमोली विमेंस फाउंडेशन ' च्या महिलांनी सरकार नगर ग्राउंड वर ' वृक्ष ' रोपण करून पर्यावरण वाचवा हा नारा लावून वृक्षारोपण केले. यावेळी वटपौर्णिमेचे निमित्त साधून महिलांनी वृक्षारोपण करून हा सण साजरा केला. आणि पर्यावरणाच्या सुरक्षितेत मोलाचा सहभाग घेतला. यातून या सर्व महिलांनी वृक्ष लावल्याने समाज आणि मानवी जीवनावर चांगला प्रभाव पडतो. हा मोलाचा संदेश दिला. या उपक्रमात अमोली वुमन च्या अध्यक्षा वनश्री मेश्राम भुवनेश्वरी धर्मपुरीवार , साधना नालमवार , हर्षा धरमसारे , अर्चना कपुर , नलिनी करपे , शालू टेपाले मॅडम ,कल्पना जिवतोडे मॅडम वैशाली गायकवाड मॅडम कोमल मेश्राम ,सिमरन कपूर वर्षा कोठेकर ,रंजना नागतोडे,राणी राव ,कोसल मॅडम इत्यादी महिलांनी अतिउत्साहने ' जागतिक पर्यावरण दिन आणि वटपौर्णिमा साजरी केली.
0 Comments