वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव जंगलात ही घटना घडली आहे. सरपण आणण्यासाठी जंगलात गेलेल्या दिनकर ठेंगरे ( वय 57) यांच्यावर वाघाने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी जंगलात गेलेल्या आणि घरी रात्री परत न आलेल्या व्यक्तीचा शोध कुटुंबीयांनी सुरू केला. वनविकास महामंडळाच्या तोहोगाव वन क्षेत्राच्या कक्ष क्र. 26 मध्ये शोधमोहिमेदरम्यान त्याचा मृतदेह आढळला. वनपथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छदेनासाठी पाठविण्यात आले आणि पंचनामा करण्याची प्रक्रिया करण्यात आली. वाघाच्या हल्ल्याच्या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे.

Post a comment

0 Comments