चिचपल्ली वनपरिक्षेत्रात झालेली वाघाची शिकार ४ चार वर्षानंतर आली उघडकीस
चंद्रपूर-ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोन मध्ये वाघिण व तिच्या दोन बछड्यांची विष देऊन शिकार केल्याचे प्रकरण ताजे असताना चिचपल्ली वनपरिक्षेत्रात सुमारे ४ वर्षांपूर्वी वाघाची शिकार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणात सहभागी नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे.


गुप्त माहितीवरून सापळा रचून चंद्रपूर येथे पडोली - घुग्घूस रोडवर सापळा रचून वाहनाने वाघाच्या अवयवांची तस्करी करताना तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून वाघाची ६ हाडे, ६ मिश्या व ५ नखे व वाहन जप्त करण्यात आले. आरोपींची चौकशी केली असता आणखी ६ आरोपींना ताब्यात करण्यात आली. आरोपींनी सुमारे चार वर्षांपूर्वी ईश्वर मेश्राम यांचे शेत सर्वे क्रमांक ४५ पिंपळखुट मध्ये ११ के.व्ही. विद्युत वाहिनीद्वारे शेतशिवारात विद्युत प्रवाह सोडून वाघाची शिकार केल्याचे समोर आले.सदर प्रकरणातील ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी हे महादवाडी,अजयपूर, पिंपळखुट,नंद्गुर येथील राहणारे आहेत.

Post a comment

0 Comments