Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

खाजगी सुरक्षा गार्डची गळफास घेऊन आत्महत्याचंद्रपूर :- शहरातील वडगाव परिसरातील आंबेडकर सभागृह मार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला गळफास अवस्थेत एका इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

आज सकाळी मॉर्निंग वॉक करायला निघालेल्या नागरिकांना गळफास घेऊन झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसतातचं तात्काळ नागरिकांनी नगरसेवक पप्पू देशमुख यांना माहीती दिली.

माहिती मिळताच पप्पू देशमुख यांनी पोलिसांना माहिती देत घटनास्थळी पोहचले, रक्षित मेश्राम वय (45) असे मृतकाच नाव असून तो खाजगी सुरक्षा गार्ड म्हणून शहरातील एका कार्यालयात कामावर होता व या परिसरात गेल्या 11 महिन्या पासून किरायाने रहात होता.

प्राथमिक चौकशीत घरगुती वादातून आत्महत्या केल्याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहचून पंचनामा केला. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies