इंदिरानगरचा सट्टा बाजार जोरात
चंद्रपूर :- मुल रोड इंदिरानगर रेल्वे पटरी या मुख्य चौकात अवैध धंद्याचे केंद्रबिंदू बनले आहे रेल्वे पटरी येथे असलेल्या महानगरपालिकेच्या कॉम्प्लेक्समध्ये दारू विकणे त्याचबरोबर सट्टापट्टी घेणे यासारखे अवैध धंदे अण्णा नामक व्यक्ती काही पोरं लावून करत आहे अनेकदा पोलिसांनी कारवाई केली धाडी टाकल्या केसेस बनवल्या परंतु हे अवैध रीत्या सट्टा बाजार करणारे पोलीस प्रशासनाला घाबरताना दिसून येत नाही आहे त्यांच्यावर पोलिसांची भीती नाही असंच यातून सिद्ध होत आहे या भागांमध्ये अवैध रित्या चालू असलेल्या सट्टा बाजारामुळे इंदिरानगर परिसरातील अनेक लोकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे पोलिसांनी अनेकदा थातूरमातूर कारवाई केल्या तरीसुद्धा हा सट्टा बाजार बंद झालेला नाही आता चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक रेड्डी सरांनी विशेष लक्ष घालून हा सट्टा बाजार कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी या परिसरातील नागरिक करू लागले आहे

Post a comment

1 Comments