विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अनोखे आंदोलन

दि. ७ जून २०२० रविवारला सोशल मीडियावरती “विज व विदर्भ आंदोलन”

कोरोनामुळे उद्योग, व्यापार, शेती, नौकऱ्याया, रोजगार बंद म्हणुन विज बिल बंद.

विज विदर्भात तयार होते. शेती, कोळसा, पाणी विदर्भाचे वापरले, प्रदूषणही विदर्भाच्या वाट्याला आले वरून कोरोनाचा मारही आम्ही सहन करातो आहो. त्यामुळे आम्हच्याकड़े पैसाही उरला नाही म्हणुन विदर्भ राज्य आंदोलन समितीनी (VRAS) निर्णय घेतला आहे की ७ जून २०२० ला लॉकडाउन मध्ये नियम पाळून घरी राहूनच विदर्भाच्या जनतेला विज व विदर्भ आंदोलन करायचे आहे.

मागण्या:
1) कोरोना असेपर्यंत विदर्भाच्या सर्वच जनतेला विज बिलातुन मुक्त करा.
2) २०० यूनिट पर्यंत विज बिल फ्री करा, त्यानंतरचे निम्मे करा.
3) शेती पंपाच्या विज बिलातुन शेतकऱ्यांना मुक्त करा.
4) विदर्भाला विज प्रकल्पाच्या प्रदुषणातुन मुक्त करा.

वरील मागण्यांचे फलक लाउन घोषणा देऊन फोटो/वीडियो विदर्भातील सर्व जनतेने ७ जुनला सोशल मीडियावरती टाकावे.

असे आवाहन अॅड.वामनराव चटप
राम नेवले ,डॉ. श्रीनिवास खान्देवाले ,
रंजना मामर्डे यांनी केले आहे.

Post a comment

0 Comments