घुग्घुस येथील विद्युत वितरण कार्यालयाचे स्थानांतरण पडोली येथे करा : मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदणखेडे
चंद्रपुर : महावितरण विभागाचे पडोली क्षेत्र आणि घुग्घुस क्षेत्र मिळुन ऐक कार्यालय घुग्घुस येथे देण्यात आलेले आहे. पडोली क्षेत्रालगत जुनी पडोली, यशवंत नगर, लहुजी नगर, दाताळा, कोसारा, मोरवा अशा आणि इतर लहान गावांचा समावेश होतो. सदरील ग्रामवासीयांना आपल्या विभागाशी निगळीत जर एखादे लहानसे काम असले तर त्यांना पायपीट करत घुग्घुस कार्यालयात जवळपास 25 ते 30 किलोमीटर जावे लागते आणि ऐक वेळा जाउन शासकीय कार्यालयातील काम झाले तर ते योगायोगच समजावे कारण घुग्घूस सब स्टेशन मधील अभियंता आणि कर्मचा-यावर क्षेत्र मोठे असल्याकारणाने येवढा तणाव असतो की एखादी केलेली तकार किंवा विद्युत मिटरची मागणी पुर्ण होण्याकरीता एक ते दोन किंवा त्यापेक्षाही अधिकचा काळ लागतो ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे ग्राहकांना सुद्धा आपल्या कार्यालयात 5 ते 6 वेळा चकरा माराव्याच लागतात. त्यामुळे त्यांना सुद्धा शारीरीक, मानसीक आणि आर्थीक त्रास सहन करावा लागतो. म्हणून पडोली, जुनी पडोली, मोरवा, यशवंत नगर, लहुजी नगर, दाताळा, कोसारा, खुटाळा या गावांसाठी
ऐका नविन सब स्टेशन किंवा कार्यालयीन कामाकरीता पडोली किंवा एम. आय. डी. सी. स्थीत

म्हाडा कॉलनी, घुग्घुस रोड, एम.आय.डी.सी. चंद्रपूर-
या जागेवर काही उपाययोजना करावी जेनेकरुन नागरीकांना आपल्या कर्मचा-यांना सुद्धा त्रास
सहन करावा लागणार नाही. अशी मागणी मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदणखेडे यांनी केली आहे.

Post a comment

0 Comments