मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती त्वरीत मंजूर करा जिल्हाधिकारी यांना राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघा चे निवेदनचंद्रपूर: वर्ग पहिली ते वर्ग दहावी पर्यंत च्या विद्याथ्र्यांना देण्यात येणारी भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती एका वर्षांचा कालावधी लोटूनसुध्दा देण्यात आली नाही. तसेच लॉकडाऊनमुळे पालकांकडे कोणतेही काम नसल्यामुळे त्यांना आर्थिक चणचण भासत आहे. त्यामुळे सत्र सुरू होण्याच्या ऐनवेळी विद्याथ्र्यांना पाठ्यपुस्तक व गणवेशाविनाच शाळाप्रवेश करावा लागणार आहे.
भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती वर्ग १ ते १० इतर मागास वर्गीय विध्याथ्र्यांकरिता उत्पन्नाच्या अटीवर सत्र २०१९ व २० या सत्रापासून लागू केली. या शासन निर्णयाचे आर्थिकदृष्ट्या मागास विध्याथ्र्यांच्या पालकांनी स्वागत केले. व शासन निर्देशाप्रमाणे शिष्यवृत्तीची कार्यवाही पालकांनी मोठ्या आस्थेनी कागदपत्र, उत्पन्नाचा दाखला, विध्याथ्र्यांचे पास बुक काढून अर्ज शाळेला सदर केले. शाळेनी सदर सर्व विध्याथ्र्यांचे प्रस्थाव जि. प. समाज कल्याण विभागाला सादर करण्यात आले. मात्र एक वर्षांचा कालावधी लोटूनही सदर शिष्यवृत्ती विध्याथ्र्यांना मिळाली नाही, तसेच सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती सुद्धा विध्याथ्र्यांना मिळाली नाही. जिल्हा परिषद व नगर परिषद शाळेतील सर्व मुलींना, व आर्थिकदृष्ट्या मागास(बीपीएल) धारक पालकांच्या पाल्यांना गणवेश दिला जातो, मात्र आर्थिकदृष्ट्यामागास असूनही (बीपीएल) नसल्याच्या कारणाने काही विध्याथ्र्यांना गणवेश मिळत नाही. ते विध्यार्थी गणवेश वाटपाचे वेळी शिक्षकांना वारंवार विचारतो सर मला गणवेश नाही का? ही बाब लहान बालकाच्या मनावर निश्चितच परिणाम करणारी आहे. ही बाब राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाच्या लक्षात येताच जिल्हाधिकारी यांच्याकडे विद्याथ्र्यांना लवकरात लवकर शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. निवेदन देतांना महासंघाचे श्री रामराव हरडे, श्याम लेडे हे उपस्थित होते व प्रदीप पावडे, देवराव दिवसे, राजू हिवंज यांनी सहकार्य केले.

Post a comment

0 Comments