श्रीमंत योगी जगदंब निस्वार्थ सेवा फाउंडेशन तर्फे हेल्थ कार्ड वाटप
चंद्रपूर:- श्रीमंत योगी जगदंब निस्वार्थ सेवा फाऊंडेशन मित्र परिवारातर्फे बंगाली कॅम्प प्रभागात bpl कार्ड धारकांना डॉ रीमाशु तावाडे , व सन्हेल तावाडे तसेच डॉ उमेश अग्रवाल यांच्या सहकार्यातून, बंगाली कॅम्प प्रभागात bpl कार्ड धारखाला निशुल्क सेवा देण्याचे व निशुल्क नेत्र चेकप हेल्थ कार्ड वितरण फाऊंडेशन च्या माध्यमातून करण्यात येत आहे. गरजुना याचा लाभ व्हावा म्हणून फाऊंडेशन मित्र परिवार bpl कार्ड धारकाचे फॉम् भरण्यात आले. वार्डातील bpl कार्ड धारकांना कार्ड वितरण करण्यात आले. 18जून राजीव गांधी नगर, संविधान चौक इथे 30 हेल्थ कार्ड वितरण करण्यात आले, 19 जून शास्त्रकार लेआऊट मॅगझीन रोड हनुमान मंदीर जवळील 40 bpl कार्ड धारकांना हेल्थ कार्डचे वितरण करण्यात आले.
20 जून आंबेडकर चौक श्यामनगर येथील 45 कार्डधारकांना कार्ड वितरण करण्यात आले, 21 जून राजीव गांधी नगर रिलायन्स टॉवर जवळ तेथिल गर्जुना 95 कार्ड वितरण करण्यात येत आहे. हे कार्य तावाडे, व अग्रवाल हॉस्पिटल च्या सहकार्याने व फाऊंडेशन च्या माध्यमातून करण्यात येत आहे. आता पर्यंत 200 लोकांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून फाऊंडेशन मित्र परिवारातर्फे कार्य सुरू आहे.

Post a comment

0 Comments