राजुरा विधानसभेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार : खासदार बाळू धानोरकरचंद्रपूर : राजुरा विधानसभेने मोठ्या प्रमाणात मतरुपी आशीर्वाद दिला आहे. मागील पाच वर्षात हे विधानसभा क्षेत्र विकासापासून कोसो दूर होते. या विधानसभा क्षेत्राला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून जनतेचे ऋण फेडणार अशी ग्वाही खासदार बाळू धानोरकर व आमदार सुभाष धोटे यांनी विधानसभेतील गावभेटी दरम्यान संयुक्त दोऱ्यात दिली.
मागील पाच वर्षात या विधानसभेचा विकास झालेला नाही. महत्वाचं म्हणजे भाजपाची सत्ता व भाजपचे आमदार असतांना देखील या विधानसभेच्या विकास झाला नाही, हि बाब अत्यंत दुर्दैवी आहे. या भागातील भंगाराम तळोधी, गोंडपिपरी, धाबा या गावांना भेट दिली. या गावातील ग्रामस्थांनी समस्यांच्या पाढा खासदार व आमदारांसमोर वाचला, त्यात प्रामुख्याने २०१७ च्या बोंडअळीची रक्कम अद्याप प्राप्त झाली नाही. या भागातील अनेक शेतकरी कर्ज मिळण्यापासून वंचित आहेत.रमाबाई आवास योजनेतील पैसे अद्याप मिळाले नाही. राष्टीय महामार्गावरच्या कामावर अडथळे ठरणारे विदयुत खांब स्थलांतरित लवकर करून ग्रामस्थांच्या विविध समस्या दूर करणार असल्याचे खासदार धानोरकर यांनी सांगितले. काही वर्षाआधी गोंडपिपरी, धाबा मार्गावरील पूल अद्याप दुरुस्त झालेला नाही. तो त्वरित दुरुस्त करण्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यासोबतच गोंडपिपरी येथे अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यामध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव व उपाययोजना, अवकाळी पावसामुळे नुकसान, शेतकरी आत्महत्या,नैसर्गिक आपत्ती, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या महत्वाच्या विषयाची माहिती घेऊन. शेतकरी आपल्या कुटुंबातील सदस्य या नात्याने त्यांचे काम करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी आमदार सुभाष धोटे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुरेश चौधरी, रामू तिवारी, नागराध्यक्ष सपना साकरवार, तुकाराम झाडे, संबुजी येलेकर, प्रवीण झाडे, बालाजी एकवणकर, देविदास सातपुते, कालिदास नागापुरे, विजय एकवणकर, काशिनाथ बोढे, योगेश्वर राऊत, सुधाकर निकुडे, देवराव शेडमाके, सचिन फुलझले, किशोर अगस्ती, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी, महावितरणचे, पोलीस निरीक्षक, आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती


Post a comment

0 Comments