भाजप युवा मोर्चा तर्फे शहीद जवानांना श्रद्धांजली !

चंद्रपुर : भारत सीमेवरील चिनी सैनिकांना लढतांना भारतीय सैनिक शहीद झाले. त्यांना भाजप युवा मोर्चा तर्फे शुक्रवार दि. १९-६-२०२० रोजी गिरणार चौक येथे भाजयुमो तर्फे श्रद्धांजली देण्यात आली. यावेळेला भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे हे उपस्थित होते. या हल्ल्याचा निषेध म्हणून चिनी वस्तुंवर मोठ्या प्रमाणात बहिष्कार करण्यात येत आहे.
भारतिय सिमेवर चिनी सैनिकांना खदेडून काढतांना भारतिय सैनिकांना विरमरण आले. या गोष्टीचा बदला भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सक्षम सरकार अवश्य घेईल. शहीदांना श्रद्धांजली देतांना भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी आपले मत व्यक्त केले.

चीनला तोडीस तोड उत्तर देण्याचा निर्धार असल्याचे मत दिल्लीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. गलवान खोऱ्यातील वाद अद्याप संपला नसला तरी आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी भारताने चीनवर मात केली आहे. गेल्या पाच दिवसांपासून भारत करीत असलेल्या राजनैतिक चर्चेला यश आले.
फ्रान्स, अमेरिका व जर्मनीने भारताची पाठराखण करीत चिनी ड्रॅगनला अप्रत्यक्ष इशारा दिला. तर चीनचे मित्रराष्ट्र असलेल्या रशियाने या प्रकरणी संयमी प्रतिक्रिया दिली. सलग तिसऱ्या दिवशीही गलवान खोऱ्यात झटापट झाली त्याच ठिकाणी दोन्ही देशांच्या समकक्ष लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा झाली. एकीकड़े चर्चेची तयारी दाखवून गलवानमध्ये नदीचा प्रवाह बदलण्यासाठी चीनने बुलडोझरसारखी यंत्रे आणली. चीनकडून लष्करी हालचाली वाढत असल्या तरी शुक्रवारी लेह, लद्दाख मध्ये आकाशात भारतीय लढाऊ हेलिकॉप्टर्सनी सीमा सुरक्षेची ग्वाही देशवासीयांना दिली. लष्कर स्तरावरील चर्चा तीन दिवसांपासून सूरू असून काही दिवस ही चर्चा अजून चालणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Post a comment

0 Comments