Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

ठाकरे सरकारला जाग आणण्यासाठी मनसेचं 'हॉर्न बजाओ' आंदोलनवाहतूक व्यवसायात कार्यरत असलेल्या प्रत्येकाचा आवाज राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.


मागील तीन महिन्यापासून संचारबंदी पूर्ण भारतात सुरू आहे,त्याचे पालन सर्व वर्गातील लोकांनी केले.आता काही प्रमाणात संचारबंदीत शिथिलता देऊन जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारने केलेला आहे,परंतु या सर्व बाबतीत सरकारचं लक्ष वाहतूक क्षेत्राकडे बिलकुल नाही, टॅक्सी ऑटोरिक्षा चालवून आपलं उदरनिर्वाह चालविणाऱ्या गोरगरीब चालकांवर उपासमरीची वेळ आलेली आहे,परिवहन मंत्री गाळ झोपेत आहे,आमचे प्रदेश अध्यक्षांनी वारंवार भेट घेण्याचा प्रयत्न केला असता तरी ही ते काही जागे झालेले नाही आहे,या बहिऱ्या सरकारला आमच्या गोरगरीब ऑटो रिक्षा,टॅक्सी चालक मालक च्या समस्या एकविण्याकरिता मान.संजय नाईक साहेब प्रदेश अध्यक्ष (वाहतूक सेना) यांच्या आदेशाने आज पूर्ण महाराष्ट्र भर वाहतूक सेनेतर्फे हॉर्न ओके हा अभिनव उपक्रम राबविण्यात आलेला आहे, त्यांच्या आदेशाचे पालन करत चंद्रपुर वाहतूक सेने तर्फे मान.प्रदेश सरचिटणीस हेमंतभाऊ व मान.जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ यांच्या मार्गदर्शनात वाहतूक जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता यांच्या नेतृत्वात शहराच्या विभिन्न ठिकाणी हे आंदोलन घेण्यात आले,यावेळी प्रतिमा ठाकूर, असलम खान,जफर बेग,सुधीर काबडे,मुन्ना पठाण,बरकत पठाण,आकाश गेडाम,बंडू पुरके आदी असंख्य ऑटो चालक व मालक यांची उपस्तिथी होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies