जिल्हा सिमा बंद असतांना अवैध दारु चंद्रपूरात दाखल होतेच कशी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केला प्रश्न

जिल्हा सिमा बंद असतांना अवैध दारु चंद्रपूरात दाखल होतेच कशी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केला प्रश्न


अवैध दारुच्या वाढत्या विक्रिवर आ. जोरगेवार यांनी घेतली पोलिस अधिक्षकांची भेट, अवैध दारु विक्री बंद करण्याचे निर्देश

चंद्रपूर ;- पार्श्वभूमीवर जिल्हात दाखल होणा-या सिमा बंद करण्यात आल्या आहे. अशात नागरिकांना जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी पासेस चि गरज आहे. हे पास काढतांनाही चांगलीच दमछाट करावी लागत आहे. मात्र हा नियम दारु तस्करांसाठी नसल्याचेच दिसून येत आहे. जिल्हा दाखल होणा-या पॉइंट वरती पोलिस बंदोबस्त असतांना जिल्हात अवैध दारु दाखल होतेच कशी असा प्रश्न आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केला असून अवैध दारु विक्रीवर पूर्णतः आळा घालण्याचे निर्देश पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांना दिले आहे. आज आमदार किशोर जोरगेवार यांनी अवैध दारुविक्रीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधिक्षकांची भेट घेतली असून या बाबत चर्चा केली.

Post a comment

0 Comments