अॅड.दीपक चटप यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा


- २३ व्या वाढदिवसाशी २३ वृक्षाची लागवड

- आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुचे वितरण

-पाथ फाउंडेशन व मित्रमंडळाचे आयोजन
- २३ व्या वाढदिवसाशी २३ वृक्षाची लागवड

- आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुचे वितरण

-पाथ फाउंडेशन व मित्रमंडळाचे आयोजन


गडचांदूर / प्रतिनिधी

गडचांदूर येथील विधी अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते अॅड.दीपक यादवराव चटप यांचा २३ वा वाढदिवस पार फाउंडेशन व मित्र मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. जिवती तालुक्यातील शेणगाव येथे गरजू कुटुंबांना अन्नधान्य कीटचे वाटप करण्यात आले. पाथ फाउंडेशनच्या वतीने राजुरा तालुक्यातील रामपूर येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. बिबी येथील निहाल ॲग्रो फॉर्म येथे मित्र मंडळाच्या माध्यमाने वृक्षारोपण करण्यात आले. २३ व्या वाढदिवसानिमित्त २३ वृक्षाची लागवड करण्यात आली. यावेळी कवी अविनाश पोईनकर,संतोष उपरे, हबीब शेख, सचिन सिडाम, स्वप्नील झुरमुरे, लक्ष्मण कुडमेथे, नागेश चटप, ऋषी चटप, सुरज गव्हाणे, निखील खोके, आदित्य आवारी, देवानंद भांडारकर, सुनील भोयर आदी मित्र मंडळींनी पुढाकार घेऊन अॅड.दीपक चटप यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा केला.

दीपक चटप हे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व विधी क्षेत्रात सक्रिय आहेत. उत्कृष्ट कवी, लेखक, वक्ते व सामाजिक प्रश्नाचे अभ्यासक, विश्लेषक म्हणून ते सुपरिचित आहे. ॲड.दीपक चटप हे मुंबई उच्च न्यायालयात विधी सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. त्यांनी राज्यभरात विविध सामाजिक चळवळीत सक्रिय राहून तळागाळातील लोकांना न्याय मिळवून दिला. शेतकरी चळवळीतील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून समाजाला प्रेरणादायी आहे. अतिशय कमी वयात अॅड.दीपक चटप यांनी केलेले काम युवकांसाठी प्रेरणा ठरत असून राज्यातील विविध पुरस्काराने दिपकला सन्मानित करण्यात आले आहे. सामाजिक व विधी क्षेत्रात ॲड.दीपक चटप यांचे अवघ्या तेविसाव्या वर्षातील योगदान अतुलनीय आहे. मित्रमंडळींनी पुढाकार घेऊन आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा केला हे माझ्यासाठी अतिशय आनंददायी व सतत काम करण्यासाठी प्रोत्साहन देणारे आहे असे मत अॅड.दीपक चटप यांनी व्यक्त केले.

Post a comment

0 Comments