Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

वीज बिल समजून घ्या वेबिणार संवादातून वीज ग्राहकांनी सहभागी होण्याचे महावितरणचे आवाहन

चंद्रपूर, दि.29 जून: लॉकडाऊन काळातील तीन महिन्याचे वीज बिल एकत्रित आल्यामुळे घरगुती व वाणिज्य ग्राहकांना वीज बिलाविषयी झालेला संभ्रम दूर करण्यासाठी व सदर ग्राहकांच्या वीज बिलाविषयी असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महावितरण, चंद्रपूर विभागाद्वारे चंद्रपूर, मुल व सावली तालुक्यातील वीज ग्राहकांसाठी आपले वीज बिल समजून घ्या या विषयावर ऑनलाईन वेबिणारचे मंगळवार दिनांक 30 जून रोजी दुपारी 12.30 ते दुपारी 2 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. तरी चंद्रपूर विभागाअंतर्गत येणाऱ्या ग्राहकांनी जास्तीत जास्त (घरगुती व वाणिज्य) सहभाग नोंदवून वीज बिलाविषयी असलेल्या शंकाचे निरसन करून घेण्याचे आवाहन महावितरण चंद्रपूर विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

घरगुती व वाणिज्य ग्राहकांसाठी होणाऱ्या वेबिणारमध्ये महावितरणने वितरीत केलेले माहे एप्रिल, मे व जून महिन्याचे वीज बिलाविषयी असलेला संभ्रम व समस्यांचे निराकरणही करण्यात येणार आहे. वेबिणारमध्ये सहभागी होण्याकरिता महावितरणच्या https://meet.google.com/uik-rjyw-cdn या लिंकवर जाऊन घरगुती व वाणिज्य वीज ग्राहकांना सहभागी होता येईल.

ग्राहकांच्या वीज बिलाविषयी समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपले वीज बिल समजून घ्या. या वेबिणारमध्ये चंद्रपूर विभागाचे कार्यकारी अभियंता, सर्व उपविभागीय अभियंते व बिलिंग विभागाशी संबंधीत अधिकारी हि सहभागी होणार आहेत. याशिवाय https://billcal.mahadiscom.in/consumerbill या लिंकवर हि ग्राहक स्वत: आपल्या वीज बिलाची पडताळणी करू शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies