जिल्हाधिकारी कार्यालय येथे मान्सून पूर्व आपत्ती व्यवस्थापनाची एक दिवसीय कार्यशाळा
चंद्रपूर, दि. 5 जून: विभागीय आयुक्त नागपुर विभाग, नागपुर यांनी दिनांक 24 मे रोजी मान्सुन पूर्व तयारी 2020 बाबत आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार समादेशक तथा नियंत्रण अधिकारी राज्य आपती प्रतिसाद दल, नागपूर जी. श्रीधर यांचे मार्गदर्शनानुसार टीम क्र.2 चमूचे पोलीस निरीक्षक प्रमोद एच. लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक डी.एन. मंडल व त्यांचे एकूण 08 प्रशिक्षक चमूने दिनांक 1 जून रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय व इरई धरण येथे एक दिवसीय प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाची कार्यशाळा घेण्यात आली.

चंद्रपूर जिल्हा शोध व बचाव पथक (जिल्हाधिकारी कार्यालय) व जिल्हा शोध व बचाव पथक (पोलीस दल), इको-प्रो संस्थेचे सदस्य व इतर सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच महसूल संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग होता. यांना जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती व मानव निर्मित आपत्ती या विषयावर गाव पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर अचानक उद्भवलेल्या आपत्तीचे निवारण करण्यासाठी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक घेण्यात आले.


या बाबींचे प्रशिक्षण व मार्गदर्शन:

स्थानिक संस्था व स्थानिक प्रशासन यांचे संयुक्त उपक्रमाने आपत्ती व्यवस्थापन करिता लागणारे स्टॅंडर्ड डिवाइस व इंप्रोवाईज्ड डिवाइसचा वापर करण्याचे प्रशिक्षण, नॉट बांधण्याचे प्रशिक्षण, सीपीआर, एफबीएओ, सापांचे प्रकार, सर्पदंशाचे प्राथमिक उपचार विजेपासून, आगीपासून बचाव बोट चालवण्याचे व धरणामध्ये पोहण्याचे प्रशिक्षण, बोट पाण्यात अचानक उलटी झाल्यास स्वतःचे व इतरांचे प्राण वाचवून सदर बोट सरळ करण्याचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक तसेच भूकंप आल्यास शोध व बचाव करण्याचे प्रशिक्षण देऊन संकटाचे वेळेस क्षमतेनुसार अत्यंत साहसाने व धैर्याने नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपती आल्यास मदत कार्य करणे या बाबतचे व्याखानाद्वारे,प्रात्यक्षिकाद्वारे व मल्टी मेडिया प्रोजेक्टर वर आपती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण एक दिवसीय कार्यशाळेद्वारे यशस्वीरीत्या प्रशिक्षण दिले. तसेच जिल्हा स्तरावर उपलब्ध असलेल्या आपत्ती व्यवस्थापन साहित्याची पाहणी केली.

सदर कार्यशाळा जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांचे मार्गदर्शनानुसार निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे तसेच तहसिलदार यशवंत धाईत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेश सुरवाडे यांचे उपस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातील शोध व बचाव पथकाला जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती व मानव निर्मित आपत्ती या विषयावर मार्गदर्शन केले.


Post a comment

0 Comments