Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

गडचंदुरच्या काँग्रेस नगरसेवकाचा आणखी नवा कारनामा

काँग्रेस पक्षाच्या बरिष्ठ नेत्यांनीच करायला हवी कारवाई !

राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे यांनीच करायला हवे पाप्पय्या ला पदमुक्त !

कन्टेनमेंट झोन मध्ये असलेला पाप्पया पोत्रमवार ही काँग्रेसच्या कार्यक्रमात लावली हजेरी !गडचांदूर :- आज सोमवार दि. २९ जुन रोजी राजुरा काँग्रेस पक्षाचे आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात बरिष्ठांच्या आदेशानुसार पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे गडचांदुरचे वादग्रस्त स्विकृत नगरसेवक पाप्पया पोत्रमवार यांनी ही हजेरी लावली.

नुकतेच दोन दिवसांपूर्वी गडचांदुर मध्ये एक रुग्ण आढळला. आढळलेला हा रूग्ण गडचांदुर मधील पाप्पया पोत्रमवार यांच्या घराशेजारच्या असल्यामुळे हे क्षेत्र प्रतिबंधित (कन्टनमेन्ट झोन) घोषित करण्यात आले आहे, प्रतिबंधित क्षेत्रातील स्विकृत सदस्य असलेले पाप्पय्या पोत्रमवार हे काँग्रेसने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात उपस्थित झाले आणि त्यांच्याच पक्षातील एका सुज्ञ पदाधिकाऱ्यांनी त्यांनी त्या ठिकाणाहुन वापस जा असे पिटाळून लावले.
शासन स्तरावर आज च्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांनी शासन निर्देशाचे पालन करावे असे आदेश दिल्या जात आहेत. शासनाचे प्रत्येक निर्देश हे समाजसेवक आणि नेत्यांनी त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येकांनी पालन करायला हवे असा संदेश द्यायला हवा अशी प्रशासनाची मनिषा असते. परंतु गडचांदूर मध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते पाप्पया पोत्रमवार यांनी दोन दिवसापूर्वी स्वतःच्या फेसबुक स्टेटस् मध्ये ब्ल्यु फिल्म (न्युड सिन) व्हायरल झाली होती, सोशल मिडीयाच्या माध्यमातून यावर भयंकर टिका करण्यात आली, काँग्रेसच्या पक्षाचे राजुरा येथील आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी स्विकृत सदस्य असलेल्या पाप्पय्या पोन्नमवार यांचे पदचं वरील प्रकरणात हिसकायला हवे होते. परंतु तसे काहीही झाले नाही. आज सोमवार दि. २९ जुन रोजी पेट्रोल व डिझेलच्या झालेल्या दरवाढीविरोधात अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने संपूर्ण भारतात आंदोलन केले. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील गडचांदुर याठिकाणी आम. सुभाष धोटे यांचे नेतृत्वात आंदोलन करण्यात आले, या आंदोलनात काँग्रेसचे स्विकृत सदस्य असलेल्या पाप्पया पोत्रमवार यांनी हजेरी लावली. कन्टेनमेंट झोन मध्ये असलेल्या पाप्पय्यांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करायला हवे, परंतु तसे न करता मुजोर पाप्पयांनी याठिकाणी आपली हजेरी दर्शविली, आणि त्यांच्याच पक्षाच्या एका सुज्ञ पदाधिकाऱ्यांनी त्यांना त्याठिकाणाहुन बाहेर जाण्याचा संदेश दिला, हे बरिल छायाचित्रावरून स्पष्ट होत आहे. शासकीय निर्देशांचे पालन करण्याचे वारंवार आवाहन शासकीय यंत्रणेकडून करण्यात येत आहे. शासकीय निर्देशांची फक्त पालनचं करायचे नाही, त्याची जनजागृती ही करायची आहे, ही जबाबदारी प्रशासनासोबतचं राजकीय पुढारी आणि समाजसेवकांची ही आहे. या कर्तव्याचे पालन सगळ्यांनीच करायला हवे.
आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बाधितांची संख्या ही एक-दोन नाही तर ७-१० अशी वाढत आहे, यासाठी शासन निर्देशांचे पालन व्हावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पाप्पय्या पोत्रमवार सारखे सामाजिक क्षेत्रात वावरणारे राजकीय व्यक्ती जर या आव्हानाला तिलांजली देत असतील तर त्यांच्यावर त्यांच्याच पक्षाने कार्यवाही करायला हवी, हे अपेक्षित आहे. दोन दिवसांपूर्वी याच पाप्पया पोत्रमवार यांच्याच फेसबुक वर क्युफिल्म व्हायरल झाली, आपली चुक लपविण्यासाठी या अशिक्षीताने माझ्या मुलाच्या हातुन अनावधानाने ही चुक झाली यासाठी दिलगिरी व्यक्त केली. पाप्पय्या पोत्रमबार यांच्या मुलाचे वय आजच्या स्थितीमध्ये हे पाच वर्षाचे आहे. पाच वर्षाचा मुलगा पाप्पया च्या म्हणण्यानुसार गेम खेळत होता आणि त्याने ती फिल्म फेसबुकच्या स्टेटस् वर टाकली, याचा निर्णय जिल्ह्याचे पालकमंत्री, त्या क्षेत्रातील आदरणिय आमदार सुभाषजी धोटे यांनीच करायला हवा.
आजच्या आम. सुभाष धोटे यांच्या कार्यक्रमात कन्टेनमेन्ट झोन मध्ये असलेला पाप्पया हजेरी लावतो. शासनाचे निर्देश हे सर्वसामान्यांसाठीच आहेत का ? चंद्रपूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी आपल्या अधिकारातर्गत घ्यायलाचं हवा ? गडचांदुर नगर पंचायतच्या अति विद्वान मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांनी यावर निर्णय घेवून पाप्पया सारख्या मुर्त्यांना त्यांची जागा दाखवायलाच हवी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies