Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

आत्मभान अभियानातंर्गत कोरोना विषयावर जिल्ह्याधिकाऱ्यांचा फोन-इन कार्यक्रम




चंद्रपूर, दि. 8 जून: कोरोना जनजागृतीसाठी आत्मभान अभियान जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे. या आत्मभान अभियानांतर्गत आकाशवाणी केंद्रावर फोन-इन कार्यक्रम 13 जून पासून सुरू होणार आहे. 13 जून शनिवार रोजी प्रसारित होणाऱ्या कोरोना आणि प्रशासनाची तयारी या विषयावर जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधणार आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून जनजागृती संदर्भात नवनवीन उपक्रम राबवित आहे. नागरिकांमध्ये कोरोना विषाणू विषयी सविस्तर माहिती व्हावी, दैनंदिन जीवनात कशी काळजी घ्यावी, कोरोना नियंत्रण होण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत कोणते उपाय योजना राबविल्या जात आहे. याविषयीचे काही प्रश्न आपल्या मनात असतील तर आपण थेट फोन करून हे प्रश्न विचारू शकता.

या फोन-इन कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण दिनांक 10 जून बुधवार रोजी होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत जास्तीत जास्त 07172-254634 या संपर्क क्रमांकावर संपर्क करून आपल्या मनातील प्रश्न विचारू शकता.

कोरोना आणि प्रशासनाची तयारी याविषयी नागरिकांमधील असलेल्या प्रश्नांच, शंकांच जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार निरसन करतील.तेव्हा अवश्य फोन करा आणि फोन-इन या कार्यक्रमात सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies